Voice of Eastern
आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमी

डेंग्यूने महिनाभरात घेतला दुसरा बळी; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न टांगणीला

banner

कल्याण :

डेंग्यूने कल्याणमध्ये महिनाभरात दुसरा बळी घेतल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका रुग्णालयात १० डेंग्यूचे रुग्ण सापडून आले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

४ सप्टेंबर रोजी मोहने येथील इंजिनियर असलेल्या प्राची भास्कर तरे हिचा डेंग्यूने मृत्यू झाला होता. त्यानंतर बुधवारी सायंकाळच्या सुमारास मोहने येथील मुकेश सुखदेव राणे (३२) या तरुणाला डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली. मुकेशला ताप येत असल्याने त्याचे रक्त तपासणी केल्यावर डेंग्यू पॉझिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाले होते. त्याच्या शरीरातील पांढऱ्या पेशी मोठ्या प्रमाणात घटल्याने त्याला कल्याणातील एका खाजगी रुग्णालयात सोमवारी उपचारार्थ दाखल करण्यात आले. या रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याची तब्येत खालावल्याने येथील डॉक्टरांनी मंगळवारी मुकेशला इतर खाजगी किंवा मुंबईतील शासकीय रुग्णालयात तात्काळ हलविण्याचा सल्ला दिला. भेदरलेल्या नातेवाईकांनी रुग्णवाहिकेतून त्याला घेऊन जात असताना तब्येत अधिक खालावल्याने त्याला मुलुंड येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती अधिकच खालावल्याने त्याला मुंबईतील केईएम रुग्णालयात नेण्यास डॉक्टरांनी सांगितले. केईएम रुग्णालयात मुकेशला नेले असता डॉक्टरांनी त्याला तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केले.

कल्याणच्या मोहने परिसरात महिनाभरात डेंग्यूने दुसरा बळी घेतल्याने आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

आरोग्य केंद्रात वेळेनुसार वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित

मोहने येथील यादव नगर परिसरात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने नव्यानेच आरोग्य केंद्राची उभारणी केली आहे. या आरोग्य केंद्रावर मोठ्या प्रमाणात उपचाराकरिता नागरिक येत असतात. सकाळी साडेनऊ वाजता आरोग्य केंद्र उघडले जाते मात्र वैद्यकीय अधिकारी एक ते दोन तास उशिरा येतात. याबाबत आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता डॉक्टर अन्य ठिकाणी ही रुग्ण तपासणीसाठी जात असल्याचे सांगण्यात आले. डॉक्टर उशिरा येत असल्याने रुग्णांना किमान दोन तास वाट पाहावी लागते.

Related posts

रास गरब्याच्या रंगात रंगले ठाण्यातील विशेष मुले

नवजात बालकांच्या सुदृढ व सुयोग्य वाढीसाठी ठाणे महानगरपालिका करणार आयआयटी मुंबईसोबत सामंजस्य करार

रोहित्र दुरुस्तीसाठी आता महावितरण ॲपवर माहिती देण्याची सुविधा

Leave a Comment