मुंबई :
एखादे बाळ जन्माला आल्यानंतर प्रत्येक घरामध्ये आनंदाचे वातावरण असते. त्या बाळाच्या पावलाने सार्या घरामध्ये चैतन्य संचारते. असेच वातावरण सध्या मुंबईतील राणीच्या बागेत आहे. राणीच्या बागेत आलेल्या ‘ऑस्कर-वीरा’मुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. हम्बोल्ट पेंग्विनच्या मोल्ट व फ्लिपर या जोडीने १८ ऑगस्टला जन्म दिलेल्या नर पिल्लाचे नाव ‘ऑस्कर’ तर बंगालचा वाघ असलेल्या शक्ती व करिष्मा या जोडीने १४ नोव्हेंबरला जन्म दिलेल्या मादी बछड्याचे नाव ‘वीरा’ असे ठेवले आहे. त्यामुळे या ‘ऑस्कर-वीरा’ची धम्माल आता राणीच्या बागेत नागरिकांना पाहायला मिळणार आहे.
मुंबई प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन कुटुंबात ऑस्करचे स्वागत!
We welcome Oscar to the Mumbai Zoo’s Penguin family!#themumbaizoo#vjbudyanandzoo#zoostories#penguin #oscar#newmember#mybmc
@my_bmc @CZA_Delhi@moefcc pic.twitter.com/76Kgjp3shp
— The Mumbai Zoo (@TheMumbaiZoo) January 18, 2022
औरंगाबादमधील सिद्धार्थ गार्डन प्राणीसंग्रहालयातून तब्बल १५ वर्षांनंतर म्हणजेच १२ फेब्रुवारी २०२० रोजी बंगाल वाघाची जोडी शक्ती व करिष्मा यांना वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयामध्ये आणण्यात आले. वाघासाठी नैसर्गिक अधिवासाची निर्मिती करण्यासाठी धबधबा, अनुकूल लॅण्डस्केप, पारदर्शक काचेची प्रदर्शनी तयार केले होते. या वातावरणात वाघीण करिष्माने जन्म दिलेला बछडा आता दोन महिन्यांचा झाला आहे. सहा महिन्यांची होईपर्यंत तिला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले जाणार असून, तिला जंताची औषधे व लसीकरण करण्यात येत आहे. तिला कोणतीही बाधा होणार नाही याची काळजी घेण्यात येत असल्याचे महापौरांनी सांगितले. हम्बोल्ट पेंग्विनच्या नर मोल्ट आणि मादी फ्लिपर या जोडीने पिलाचे नामकरण ‘ऑस्कर’ ठेवण्यात आले आहे. या नामकरणाची घोषणा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी १८ जानेवारीलाराणीच्या बागेतील थ्रीडी ऑडिटोरियममध्ये केक कापून केली. यावेळी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ.संजय त्रिपाठी, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी, डॉ. कोमल राऊळ उपस्थित होते.