Voice of Eastern

मुंबई:

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. शिवसेनेच्या  वतीने सुनील शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली. नुकतेच काल सुनील शिंदे यांनी मुंबईतील जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, तसेच या वेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक देखील हजार होते. मात्र अनेकांनी या वेळी मास्क घातला नव्हता आणि मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने सोशल डिस्तनसिंगचा फज्जा उडाला. यामुळेच बहुतेक शिवसैनिकांनाच कोरोना नियमांचा विसर पडला का? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.

 

हे ही वाचा – ३५ लाखांहून अधिक १८ वर्षांखालील मुले लसीकरणाच्या प्रतीक्षेत

राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असतानाचे चित्र दिसत आहे. एका बाजूला राज्याचे मुखमंत्री यांनी स्वतः सांगितले आहे की मास्क घाला व कोरोना नियमांचे पालन करा असे आवाहन राज्याचे सर्वच जनतेला केले आहे. मात्र कालच्या सुनील शिंदे यांचा विधान परिषदेचे उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसैनिकांची झालेली गर्दी पाहता शिवसैनिकांनीच या आवाहनाला केराची टोपी दिल्याचे पाहायला मिळाले.

हे पण वाचा – दुसरा डोस घेण्याकडे मुंबईकरांचे दुर्लक्ष

महाराष्ट्रात सोमवारी तब्बल ६५६ नवीन कोरोना रुग्ण सापडले तर ८ लोकांचा कारोनामुळे मृत्यू झाला. राज्यात आता पर्यंत ६६,३०५,३१ एकूण कोरोना रुग्ण सापडले असून १,४०,७४७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मुंबईत तर चक्क महानगरपालिकेच्या वतीने मास्क न घालणाऱ्या सामान्य नागरिकांकडून दंड वसूल केला जातो.

 

Related posts

बीकॉम बँकिंग अँड इन्शुरन्स परीक्षेचा निकाल जाहीर

आयआयटी मुंबई बनवणार हवामानाचा अंदाज वर्तवणारे अ‍ॅप

रायगडमध्ये १२९४ देवींचे होणार आगमन

Leave a Comment