नवी दिल्ली :
देशभरात आरोग्य सेवा वितरण प्रणाली मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने डिजिटल आरोग्यसेवा देण्याच्या दृष्टीने उचललेल्या पावलांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे देशामध्ये आरोग्य सेवांमध्ये डिजिटल क्रांती घडून येत असल्याचे दिसून येत आहे. आरोग्य उपक्रमाच्या डिजिटल क्रांतीच्या अंमलबजावणीसाठी सरकारकडून विविध योजना व उपक्रम सुरू करण्यात येत आहेत.
आरोग्य क्षेत्रात डिजिटल आरोग्य तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीसाठी सक्षम वातावरण निर्माण करण्यासाठी आयुष्मान भारत डिजिटल मोहीम सुरू करण्यात आली आहे. आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM)अंतर्गत, आरोग्य ओळखपत्र (हेल्थ आयडी), वैद्यकीय व्यावसायिक नोंदणी (हेल्थ प्रोफेशनल रजिस्ट्री ,HPR), आरोग्य सुविधा नोंदणी ( हेल्थ फॅसिलिटी रजिस्ट्री ,HFR) आणि माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी डिजिटल पायाभूत सुविधा या तीन प्रमुख नोंदणी आस्थापना विकसित केल्या आहेत. आयुष्मान भारत डिजिटल मिशन(ABDM) याअंतर्गत स्थापन केलेल्या डिजिटल आरोग्य परिसंस्था या जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्राथमिक, माध्यमिक आणि तृतीय स्तरावरील सुविधांमध्ये सातत्याने माहितीची देवाणघेवाण सुनिश्चित करत असते. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी परवडणारा आणि कमी खर्च,चाचण्यांची कमीवेळा पुनरावृत्ती, अचूक औषध, व्यक्तिसापेक्ष उपचार योजना आणि सर्व व्यवस्थेमधील सेवेची गुणवत्ता यांचा लाभ नागरिकांना होत आहे.
नागरिकांना कोविड तसेच गैर-कोविड आजारांसाठी मोफत दूर आरोग्य सल्ला सेवा प्रदान करण्यासाठी भारत सरकारने देखील सक्रियपणे ई-संजीवनी टेलिमेडिसीन प्लॅटफॉर्म लागू केले आहे. ही व्यवस्था ३६ राज्ये-केंद्रशासित प्रदेशांमधून कार्यान्वित झाली आहे आणि आरोग्य आणि निरामय जीवन केंद्रे (हेल्थ अँड वेलनेस सेंटर्स ,HWCs) यामधून मध्ये हब आणि स्पोक मॉडेलद्वारे सल्लामसलत करण्यासोबतच नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने सल्लामसलत डॉक्टर/तज्ञ वैद्यकीय सेवा प्रदान केली जात आहे.