Voice of Eastern

मुंबई :

बॉलीवूड आणि लोकप्रिय संगीत यांच्यात एक दुवा ठरण्याच्या उद्दिष्टाने मनोरंजन व क्रीडा गुरु म्हणून ओळख असलेले शैलेंद्र सिंग यांनी एक वेगळा प्रयोग केला आहे. ‘दिल से दिल तक’या अल्बमच्या माध्यमातून ते संगीत व व्हिडीओ दिग्दर्शक झाले असून त्यांनी विविध १० संगीत प्रकारांमधील १० गाणी त्यातील प्रत्येकाच्या व्हिडीओसह सादर केली आहेत. भारतातील सर्वोत्तम प्रतिभेचा वापर करत होतकरू व युवा कलाकारांना घेत शैलेंद्र सिंग यांनी आगळावेगळा प्रयोग नवीन व्यासपीठावर केला असून त्याद्वारे हा बहुप्रतीक्षित अल्बम २०० कलाकारांच्या सहभागाने चित्रित करण्यात आला आहे.

पहिले गाणे ‘झिया’ हे २५ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित होणार असून त्यानंतर प्रत्येक शुक्रवारी एक अशी १० गाणी १० आठवडे प्रदर्शित होणार आहेत. हे सर्व एका सामाजिक उद्देशाने प्रेरित होऊन केले जात आहे. या अनोख्या अशा अल्बममधून मिळणारा निधी कोविडने बाधित झालेल्या मुलांच्या कल्याणासाठी ‘मॅजिक बस फाऊंडेशन’च्या माध्यमातून वापरला जाणार आहे. ‘दिल से दिल तक’ हा बॉलीवूडमधील पहिला स्वतंत्र संगीत अल्बम असून त्याद्वारे एवढ्या मोठ्या प्रमाणावरील कलाकार पहिल्यांदाच स्वतंत्र, वेगळे संगीत निर्माण करण्यासाठी एकत्र आले आहेत. त्यामध्ये एक नाट्य असून देशाला प्रिय असलेल्या बॉलीवूडची कहाणी त्यातून उधृत होणार आहे.

मी स्वतःला अभिव्यक्तीवादी समजतो आणि त्यामुळे मला सतत काही न काही निर्माण करण्याची आस आहे. मी संगीतप्रेमी आहे. आपण चित्रपटांमध्ये जी गाणी पाहतो त्यातील कथाकथन आणि स्वतंत्र संगीत निर्मिती यांच्यामध्ये एक दरी असल्याचे मला जाणवते. म्हणून मला अशा स्वतंत्र अल्बमची निर्मिती करायची होती. म्हणूनच या अल्बमच्या निर्मितीसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर कलाकारांना मी एकत्र आणल्याचे संगीत आणि व्हीडीओ दिग्दर्शक शैलेंद्र सिंग यांनी सांगितले. ‘दिल से दिल तक’मध्ये ‘झिया’, ‘कुरबात’, ‘प्यार आना’, ‘धोकेबाज’, ‘कली’, ‘दिल मांगे मोअर’, ‘शुक्राने’ आणि ‘सफर’, ‘मेहफिल’ व ‘लेट्स गो डिस्को’ ही गाणी आहेत.

Related posts

आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘कुलगुरु का कट्टा’

युवा खेळाडू आकांक्षाची अनुभवी राष्ट्रीय विजेत्या काजलवर मात 

राज्य शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर!

Leave a Comment