Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशिक्षण

मुंबई विद्यापीठाचा विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दिलासा, मराठीमध्ये उपलब्ध करणार पुस्तके

banner

मुंबई :

महाराष्ट्राच्या शहरी भाग वगळता ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थी हे विधीचे शिक्षण मराठीतून घेण्याला प्राधान्य देतात. मात्र मराठीमधून पुस्तके उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांची प्रचंड कोंडी होती. विद्यार्थ्यांचे विधीचे शिक्षण सुलभ व्हावे यासाठी युवासेना सिनेट सदस्यांकडून विधी विद्यार्थ्यांच्या समस्या मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्याकडे मांडण्यात आल्या. त्यावेळी त्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडून विद्यार्थ्यांनी मराठीमध्ये पुस्तके उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे मराठीमध्ये पुस्तके उपलब्ध करण्याच्या कुलगुरूंच्या आश्वासनामुळे विधीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या अधिसभेमध्ये युवासेना सिनेट सदस्य अ‍ॅड. वैभव थोरात यांनी विधी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये येणार्‍या अडचणी कुलगुरूंसमोर मांडल्या. यावेळी त्यांनी मुंबई शहरातील काही महाविद्यालये सोडली तर विद्यापीठाच्या ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील बहुतांश विद्यार्थी हे विधीचा अभ्यास हा मराठीमधून करण्यावर भर देतात. मात्र या विद्यार्थ्यांसाठी बाजारामध्ये दोन ते तीन प्रकाशकांची पुस्तके उपलब्ध असल्याने त्यांना नोट्स काढणे व अभ्यास करणे अवघड जाते. अनेक विद्यार्थ्यांना इंग्रजीच्या नोट्सचे मराठीमध्ये भाषांतर करावे लागते. अनेक विद्यार्थी हे जळगाव, परभणी, नांदेड, पश्चिम महाराष्ट्रात जाऊन तिकडून नोट्स आणतात. मात्र त्या नोट्स सुद्धा तुटपुंज्या असतात. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत असतो. त्यामुळे ज्या प्रमाणे आयडॉलमधील विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाकडून शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात येते. त्याचप्रमाणे विधीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने ठोस पावले उचलावीत अशी मागणी युवासेना सिनेट सदस्य अ‍ॅड. वैभव थोरात याने केली होती. या मागणीवर कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी विधीच्या विद्यार्थ्यांची समस्या लक्षात घेऊन त्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलण्यात येतील, असे आश्वासन दिले. कुलुगरूंच्या या निर्णयामुळे मुंबई विद्यापीठातीलच नव्हे तर राज्यातील सर्व विद्यापीठात विधी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

विद्यापीठ, महाविद्यालयांच्या नावांचे फलक मराठीत लावा !

राज्य सरकारकडून मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा यासाठी सर्व प्रयत्न सुरु आहेत. यापार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या नावाचे फलक प्रवेशद्वारावर मोठ्या व ठळक अक्षरात मराठी भाषेत लिहिण्यात यावे. तसेच महाविद्यालयीन प्रवेश अर्ज आणि माहितीपत्रक मराठीत असावे असे निवेदन सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, महादेव जगताप, शशिकांत झोरे आणि शितल शेठ देवरुखकर यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांना दिले.

Related posts

मुंबईतील एसारएचे ५१७ प्रकल्प रद्द – जितेंद्र आव्हाड

दिव्यांग गौरव आंबवणे चमकला

Voice of Eastern

एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयात परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची कसरत

Leave a Comment