Voice of Eastern

मुंबई

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) आस्थापनेवरील विविध संवर्गातील ५६५ रिक्त पदे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून १७ सप्टेंबर २०२१ सकाळी ११ वाजेपासून ते १४ ऑक्टोबर, २०२१ रोजी रात्री २३.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

पदभरती प्रक्रिया विविध संवर्गातील एकूण ५६५ रिक्त पदांसाठी राबविण्यात येत असून त्यामध्ये कार्यकारी अभियंता (स्थापत्य) १३ पदे, उप अभियंता (स्थापत्य) १३ पदे, मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी २ पदे, सहायक अभियंता (स्थापत्य) ३० पदे, सहाय्यक विधी सल्लागार २ पदे, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ११९ पदे, कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक ६ पदे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ४४ पदे, सहायक १८ पदे, वरिष्ठ लिपिक ७३ पदे, कनिष्ठ लिपिक टंकलेखक २०७ पदे, लघुटंकलेखक २० पदे, भूमापक ११ पदे, अनुरेखकाच्या ७ पदांचा समावेश आहे.

रिक्त पदांचा सविस्तर तपशील, शैक्षणिक व अनुभवाची अर्हता, विहित वेतनश्रेणी, सामाजिक/समांतर/दिव्यांग आरक्षण, वयोमर्यादा, शुल्क, नियुक्तीच्या सर्वसाधारण अटी, शर्ती व प्रक्रिया, ऑनलाइन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क सादर करण्याबाबतच्या सूचना इत्यादी बाबत सविस्तर तपशील केवळ महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या https://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर दि. १७ सप्टेंबर, २०२१ रोजी सकाळी ११ वाजेपासून उपलब्ध राहील. उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करण्याकरता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर असलेल्याच माहितीचे व सविस्तर जाहिरातीचे अवलोकन करावे, असे आवाहन म्हाडाचे सचिव राजकुमार सागर यांनी केले आहे.

म्हाडा प्रशासनाने भरती प्रक्रियेसाठी कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व एजंट म्हणून नेमलेले नाही. भरती प्रक्रियेबाबत कोणत्याही अशा व्यक्तींशी परस्पर व्यवहार करू नये तसेच त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये.

Related posts

एमएचटी सीईटी परीक्षा ऑगस्टमध्ये होण्याची शक्यता

जागतिक हृदय दिनानिमित्त वाहतूक पोलीस आणि चालकांना स्ट्रेस बॉलचे वितरण

Voice of Eastern

रायगडवर शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याची जय्यत तयारी

Voice of Eastern

Leave a Comment