Voice of Eastern

मुंबई :

आपल्या प्रत्येक भाषणातून महिलांचा आदर करण्याचे धडे देणार्‍या राज ठाकरे यांच्या मनसैनिकांनी त्यांची शिकवण धाब्यावर बसवत एका महिलेला शिवीगाळ करत चक्क मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नागपाडा परिसरामध्ये बॅनर लावण्यावरून एका महिलेला मनसेच्या पदाधिकार्‍याने शिवीगाळ करुन मारहाण केली. याप्रकरणी नागपाडा पोलिसांनी मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरुद्ध मारामारीसह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल करत उपविभागप्रमुख विनोद अरगिले, राजू अरगिले आणि सतीश लाड या तिघांना ताब्यात घेतले आहे.

गणेशोत्सानिमित्त मुंबादेवी येथे मनसे कार्यकर्त्यांकडून गणेशभक्ताच्या स्वागतासाठी काही बॅनर लावण्यात येत होते. २८ ऑगस्टला नागपाडा येथील कामाठीपुरा, गल्ली क्रमांक आठजवळ पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून बॅनर लावण्यात येत असताना एका महिलेने त्यांना विरोध केला. या महिलेच्या मेडिकलच्या दुकानासमोरच ते बॅनर लावत असल्याने तिने त्यांना विरोध केला. यावरुन त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली आणि उपविभागप्रमुख विनोद अरगिले यांनी तिला शिवीगाळ करुन धमकी दिली होती. तिला धक्काबुक्की केल्याने ती महिला दोन वेळा खाली पडली होती. हा संपूर्ण प्रकार नंतर सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. या घटनेनंतर या महिलेने मनसेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध नागपाडा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर संबंधित कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच तिघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. दरम्यान या घटनेनंतर मनसेच्या वतीने एक व्हिडीओद्वारे या घटनेमागील खरे कारण सांगण्याचा प्रयत्न झाला होता.

Related posts

‘आश्रय’ सिनेमाचा ट्रेलर लाँच !

१९ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘टकाटक २’

विकासकामांसाठी शासन पाठीशी, जनहिताची कामे थांबणार नाहीत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

Leave a Comment