Voice of Eastern
क्रीडा ताज्या बातम्या मोठी बातमी

जिल्हा अजिंक्यपद खो खो स्पर्धा : पश्चिम रेल्वे, महावितरण, मध्य रेल्वे, मुंबई  महापालिका उपांत्य फेरीत

banner

मुंबई : 

मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने लायन्स क्लब ऑफ माहीम व लायन्स क्लब ऑफ मुंबई एलिट यांच्यातर्फे सुरू असलेल्या मुंबई जिल्हा कुमार-मुली व व्यवसायिक अजिंक्यपद स्पर्धेत आजच्या दिवशी व्यवसायीकचे सामने रंगले. केशवराव दाते उद्यान, पोर्तुगीज चर्च च्या मागे वैभव स्पोर्ट्स क्लब दादर येथील मैदानात २२ मे पर्यंत सदर स्पर्धा चालू राहणार आहे.

व्यावसायिक पुरुष गटाच्या उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या सामन्यात महावितरण कंपनीने चीट चॅट कम्युनिकेशनचा (११-५-२-६) १३-११ असा २ गुण व आठ मिनिटे राखून पराभव केला. महावितरण तर्फे नरेश सावंतने १:४० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात २ गडी केले. प्रतिक वाईकरने २:३० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात १ गडी बाद केला. विराज कोठमकरने १:५० मिनिटे संरक्षण केले. चीट चॅटतर्फे प्रणय मयेकरने २:१० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात १ गडी बाद केले. विपुल लाडने १:२० मिनिटे संरक्षण केले.

व्यावसायिक पुरुष गटाच्या उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या सामन्यात मध्य रेल्वेने मुंबई पोलीसचा (९-५-२-५) ११-१० असा १ गुण व ६:४० मिनिटे राखून पराभव केला. मध्य रेल्वे तर्फे विजय हजारे तर्फे २:२०, १:४० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात २ गडी बाद केले. दिपेश मोरेने १:१०, १:४० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात १ गडी बाद केला. आदित्य येवारेने १:५०, १:१० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात २ गडी बाद केले. सोहेल शेखने १:००, १:१० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात २ गडी बाद केले. अक्षय तारदाळेने आक्रमणात ४ गडी बाद केले.

व्यावसायिक पुरुष गटाच्या उपांत्यपूर्व फेरीच्या तिसऱ्या सामन्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेने नेवल डॉक्सचा. (१०-३-५) १०-०८ असा १ डाव व २ गुणांनी पराभव केला. बृहन्मुंबई तर्फे सागर बर्फेने २:२० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात २ गडी बाद केले. विश्वजीत कांबळेने नाबाद १:३०, नाबाद २:२० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात २ गडी बाद केले. सुशील दहिंबेकरने २:५० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात २ गडी बाद केले. नेव्हल तर्फे प्रणय प्रधानने १:२० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात २ गडी बाद केले. कुशांग वैश्यने १:०० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ३ गडी बाद केले.

व्यावसायिक पुरुष गटाच्या उपांत्यपूर्व फेरीच्या चौथ्या सामन्यात पश्चिम रेल्वेने डी. डी. ॲडव्हस्टायझिंगचा (११-५-५) ११-१० असा १ डाव व १ गुणांनी पराभव केला. पश्चिम रेल्वेतर्फे प्रसाद राडीयेने २:४० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात २ गडी बाद केले. महेश शिंदेने २:००, १:०० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात १ गडी बाद केला. दिपक माधवने १:२०, १:५० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात १ गडी बाद केला. डी डी तर्फे शुभम कांबळेने १:०० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात १ गडी बाद केला. रोहन टेमकरने आक्रमणात ३ गडी बाद केले.

व्यावसायिक महिला गटाच्या सामन्यात रचना नोटरी वर्क्सने मुंबई पोलीसचा (६-२-१-४) ७-६ असा १ गुण व ७:१० मिनिटे राखून पराभव केला.

Related posts

पालकमंत्री चषक : एसआर ग्रुप उपांत्य फेरीत

मुंबई महापालिकेच्या आयुर्वेदिक दवाखान्यांना नागरिकांचा प्रतिसाद

गणरायाच्या सजावटीसाठी शाळावर्गाची हुबेहूब प्रतिकृती! ; डी. एस. हायस्कुलच्या माजी विद्यार्थ्याची कल्पकता

Voice of Eastern

Leave a Comment