मुंबई :
गेल्या काही दिवसांपासून एटीएस कोठडीत असलेला कुख्यात गुंड सुरेश पुजारीला कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे.
फिलिपिन्समध्ये अटक केलेल्या पुजारीचे भारतात प्रत्यार्पण झाल्यानंतर तो एटीएस कोठडीत होता. विविध गुन्ह्यांप्रकरणी एटीएसकडून त्याची चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले असता त्याचा अहवाल पूर्ण पॉझिटिव्ह आला आहे. पुजारीला ७ जानेवारीला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातून बरा झाल्यानंतर त्याचा ताबा पुन्हा घेणार असल्याची माहिती एटीएसमधील सूत्रांनी दिली. सुरेश पुजारीवर मुंबईमध्ये २५ पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.