Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशहर

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येणे टाळावे-प्रकाश आंबेडकर

banner

मुंबई

राज्यात तसेच मुंबईत कोरोना विषाणूच असलेला प्रसार, जगभरात काही देशात आढळून आलेला ओमायक्रॉन या विषाणूच्या नव्या व्हेरियंटमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी ऑनलाईन अभिवादन करावे असे आवाहन सरकारकडून करण्यात आले होते. मात्र या उलट भूमिका आंबेडकरी नेते आनंदराज आंबेडकर जोगेंद्र कवाडे यांनी घेतली होती.आंबेडकरी अनुयायांना येण्यापासून रोखल्यास लाखोंच्या संख्येने अनुयायी चैत्यभूमीला येतील असा इशारा देण्यात आला होता. यानंतर महानगरपालिकेने चैत्यभूमी येथे येण्यास आंबेडकरी आज मी यांना परवानगी असेल असे आदेश काढले मात्र या उलट भूमिका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरियंत बद्दल अंदाज कोणालाही येत नाही आहे. अशा परिस्थितीत आंबेडकरी अनुयायांनी येणं टाळावं असे आवाहन त्यांनी केले आहे.

हे पण वाचा- आंबेडकर अनुयायी येणारच

६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी मुंबईला यावं की नाही अशी विचारणा केली जात आहे. सध्या रेल्वे पूर्णपणे चालू झालेली नाही. एसटीचा ही संप सुरू आहे. सोबतच कोरोनाच्या नव्या variant बद्दल अंदाज कोणालाही येत नाही आहे. अशा परिस्थितीत आपण येणं टाळावं आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणाहून बाबासाहेबांना मानवंदना देण्याचं काम करूया. सोबतच आंबेडकरवादी राजकीय पक्षालाच
आम्ही तारण्याचं काम करू आणि आंबेडकरी पक्षाच्या उमेदवारालाच मतदान करु हा संकल्प सगळ्यांनी करूया असे आवाहन आंबेडकर यांनी केले आहे.

बाबासाहेबाना अभिवादन करता येणार
रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर, पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे जयदीप कवाडे यांनी आंबेडकरी अनुयायांना येण्यापासून रोखल्यास लाखोंच्या संख्येने अनुयायी चैत्यभूमीला येतील असा इशारा देण्यात आला होता. यासंदर्भात महापौरांच्या अध्यक्षतेखाली आंबेडकरी संघटनांची बैठक झाली. या बैठकीत चैत्यभूमीला येणाऱ्या अनुयायांची कशा प्रकारे नियोजन आणि व्यवस्थापन करता येईल यावर चर्चा झाली त्यानंतर महापरिनिर्वाण दिनी सर्व भीम अनुयायांना बाबासाहेबांचे दर्शन घेता येणार आहे तसेच दूरदर्शनवरून ऑनलाईन दर्शन घेता येणार असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.

Related posts

…आणि अजय-अतुल होणार पहिल्या ‘इंडियन आयडल- मराठी’चे परीक्षक

Voice of Eastern

कोरोनाची तिसरी लाट आली, इतकाच शिल्लक आहे रक्तसाठा…

Voice of Eastern

मुंबईत मलेरिया, गॅस्ट्रो रुग्ण संख्येत वाढ

Leave a Comment