मुंबई
करोना विषाणूचा नवीन प्रकार समोर आल्यानंतर जगातील अनेक देशांमध्ये खळबळ उडाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या नवीन प्रकाराला B.1.1.529 असे म्हटले असून त्याला ओमायक्रॉन असे नाव देण्यात आले आहे. डब्ल्यूएचओने करोनाच्या या नव्या विषाणूवरून धोक्याचा इशारा दिला आहे. दक्षिण आफ्रिकेत या आठवड्यात प्रथमच करोनाचा नवीन समोर आला. ओमायक्रॉन व्हायरस नेमता किती धोकादायक आहे आणि त्याच्या संदर्भात महाराष्ट्रात काय उपाययोजना सुरू आहेत या संदर्भात महाराष्ट्र कोव्हीड टास्क फोर्स चे सदस्य डॉक्टर राहुल पंडित यांनी सविस्तर माहिती दिली आहे .
आतापर्यंत फक्त डेल्टा हाच एक घातक व्हेरीअँट होता. परंतु ओमायक्रॉन ने डेल्टाला आता देखील मागे टाकलं आहे . यापुढे डबल मासकिंग करणं खूप गरजेचं आहे . दक्षिण आफ्रिकेत ज्या लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. त्यामध्ये लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांमध्ये याचे सौम्य लक्षणं दिसून येत आहेत त्यामुळे अद्यापही ज्या नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला नाही त्यांनी लवकरात लवकर लसीचा दुसरा डोस घ्यावा . सध्याच्या लस या व्हायरस वर किती परिणामकारक आहेत याबद्दल जोपर्यंत संपूर्ण अहवाल येत नाही तोपर्यंत तरी काही निष्कर्ष बांधणे योग्य नाही. त्यामुळे शक्य तितक्या लवकर लसीकरण करणं गरजेचं आहे. अशी माहिती महाराष्ट्र कोबीड टास्क फोर्स चे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी दिली आहे. डोंबिवलीत जो रुग्ण आढळला आहे त्याचा जीनोम सिक्वेसिंग अहवाल आल्यावरच नेमकं काही ते स्पष्ट होईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.