Voice of Eastern

मुंबई : 

आधुनिक काळात गिर्यारोहणासारख्या उतुंग क्रीडाप्रकारांचे महत्व उत्तम प्रकारे पटल्याचे वारंवार दिसून येऊ लागले आहे. त्यामुळे त्याचे वारे आता पुणे-मुंबई हे आघाडीचे प्रांत वगळता महाराष्ट्राच्या इतर भागांतही जोशात वाहू लागले आहे. ड्रिम अ‍ॅडव्हेंचर, सांगली या विख्यात संस्थेमार्फत नुकतीच हिमाचल प्रदेशांतर्गत सोलंगनाला-बियास कुंड या परिसरातील पिरपंजाल पर्वतरांगेत एका भव्य हिमालयीन गिर्यारोहण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

हे पण वाचा : दोन महिला गिर्यारोहकांची ६६७२ मीटर उंच गंगोत्री १ शिखरावर यशस्वी चढाई

या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात माऊंट पतालसू या ४,२०० मी. उंचीच्या हिमशिखरावर ५ ऑक्टोबर रोजी यशस्वीरीत्या चढाई करण्यात आली. ही चढाई अत्यंत विशेष मानली जात आहे. कारण या हिमशिखरावर मुंबई पोलीस दलात कार्यरत गिर्यारोहक दांपत्य आनंद शिंदे, सरिता शिंदे यांनी आपल्या आदित्य १६ वर्षे व समर्थ १२ वर्षे या मुलांसह पहिल्याच प्रयत्नात यशस्वी चढाई करुन राष्ट्रध्वज, पोलीस ध्वज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर प्रणित भगवा ध्वज शिखरमाथ्यावर फडकवून यशाचा आनंद साजरा केला. पोलीस दलात यापूर्वी अशी कामगिरी क्वचितच कोणी केली असण्याची शक्यता आहे. या मोहिमेचे अत्यंत महत्वाचे वैशिष्ठ्य म्हणजे याच दिवशी स्वरुप शेलार १० वर्षे व साई कवडे या १२ वर्षे या दोन पुणेकर चिमुरड्यांनीदेखील माऊंट पतालसू सर केले. स्वरुप शेलारची इतक्या कमी वयात ही पहिलीच मोहीम असून साई कवडे याने यापूर्वी आफ्रिका खंडाचे सर्वोच्च हिमशिखर माऊंट किलीमंजारो व युरोप खंडाचे सर्वोच्च हिमशिखर माऊंट एलब्रुस यांवर चढाई केलेली आहे.

हे पण वाचा : गिर्यारोहण क्षेत्रात आवड आहे, आता या अभ्यासक्रमातून मिळणार शास्त्रशुद्ध प्रशिक्षण

पहिल्या टप्प्यात माऊंट पतालसू हिमशिखरावर चढाई करणार्‍यांमध्ये मुंबई पोलिसातील ज्येष्ठ गिर्यारोहक पोलीस अधिकारी राजू पाटील, महाराष्ट्र पोलीस दलातील तीन झुंजार महिला अधिकारी अंजली राजपूत, सीमा आढाव आणि द्वारका पोटावदे, औरंगाबाद येथील क्रीडाप्रशिक्षक सुरेश त्रिभुवन, वयाच्या ५६व्या वर्षी माऊंट एव्हरेस्टकरिता ध्यासमग्न असलेले सांगलीचे अभय मोरे हे बँक अधिकारी, मुंबई अग्निशमन दलाचा तरुण गिर्यारोहक प्रणित शेळके आणि भारतीय सेनादलातील वरिष्ठ अधिकारी कर्नल विवेक अहलावत, मोहीम नेता रफीक शेख यांचा समावेश होता.

Related posts

जूनमध्ये पोलिसांनी जप्त केला तब्बल ६ कोटींचा ड्रग्ज साठा

कोलोरेक्टल कर्करोगाच्या रुग्णांच्या मदतीसाठी २४ तास मोफत हेल्पलाइन

ॐ तांडव सार्वजनिक उत्सव मंडळाचे हे बाप्पा पाहिलेत का?

Voice of Eastern

Leave a Comment