Voice of Eastern

नवी दिल्‍ली :

भारतीय तटरक्षक दलासह (ICG) महसूल गुप्तवार्ता संचालनालयाची संयुक्त मोहीम ७ मे २०२२ रोजी ऑपरेशन खोजबीन या सांकेतिक नावाने सुरू करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत, डीआरआय अधिकार्‍यांसह तटरक्षक जहाज सुजीतने आर्थिक क्षेत्राजवळ (Economic Zone) बारीक नजर ठेवली. खवळलेल्या समुद्रात अनेक दिवस सतत शोधकार्य आणि निरीक्षण केल्यानंतर, “प्रिन्स” आणि “लिटल जीझस” या दोन संशयित बोटी भारताच्या दिशेने जाताना दिसल्या. दोन्ही भारतीय बोटी भारतीय तटरक्षक दल आणि डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी १८ मे २०२२ रोजी लक्षद्वीप बेटांच्या किनाऱ्याजवळ रोखल्या होत्या. या बोटीतील काही खलाशांची चौकशी केली असता त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात हेरॉईनचा साठा आणला होता. त्यांनी तो दोन्ही बोटींमध्ये लपवून ठेवला असल्याची कबुली दिली. त्यानंतर  दोन्ही बोटी पुढील कार्यवाहीसाठी कोची येथे नेण्यात आल्या.

कोची येथील तटरक्षक दलाच्या जिल्हा मुख्यालयात दोन्ही बोटींची कसून झडती घेण्यात आली. ज्यामध्ये प्रत्येकी १ किलो हेरॉईनची २१८ पाकिटे जप्त करण्यात आली. एनडीपीएस कायदा, १९८५ च्या तरतुदींनुसार जप्तीची कारवाई सध्या डीआरआयकडून केली जात आहे. विविध ठिकाणी शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

डीआरआय आणि भारतीय तटरक्षक दलाद्वारे या मोहिमेचे काळजीपूर्वक नियोजन आणि अंमलबजावणी करण्यात आली. जप्त केलेले मादक पदार्थ उच्च दर्जाचे हेरॉईन असल्याचे आढळले असून  आंतरराष्ट्रीय अवैध बाजारपेठेत त्याची किंमत १ हजार ५२६ कोटी रुपये आहे. अलीकडच्या काळात डीआरआय आणि भारतीय तटरक्षक दलाने अमली पदार्थ तस्करीविरोधी काही महत्त्वाच्या कारवाया हाती घेतल्या आहेत.

अशा करण्यात आल्या कारवाया

गेल्या महिन्याभरात  डीआरआयने पकडलेला अमली पदार्थांचा हा चौथा मोठा साठा  आहे. यापूर्वी  डीआरआयने २० एप्रिल रोजी कांडला बंदरावर जिप्सम पावडरच्या व्यावसायिक आयात खेपेतून २०५.६ किलो हेरॉईन, २९ एप्रिल रोजी पिपावाव बंदरावर ३९६ किलो धागा (हेरॉईनसह) आणि नवी दिल्ली विमानतळाच्या एअर कॉम्प्लेक्स कार्गो येथे १० मे रोजी ६२ किलो हेरॉईन साठा जप्त केला होता. याचे एकूण मूल्य आंतरराष्ट्रीय अवैध बाजारात अंदाजे २५०० कोटी रुपये आहे. एप्रिल २०२१ पासून, डीआरआयने आंतरराष्ट्रीय अवैध  बाजारपेठेत अंदाजे २६ हजार कोटी रुपये किमतीचे ३,८०० किलो पेक्षा अधिक हेरॉईन जप्त केले आहे. यात सप्टेंबर २०२१ मध्ये मुंद्रा इथून तीन हजार किलो हेरॉईन, जुलै २०२१ मध्ये न्हावा शेवा बंदर येथे २९३ किलो हेरॉईन, फेब्रुवारी २०२२ मध्ये तुघलकाबाद, नवी दिल्ली येथे ३४ किलो हेरॉईनचा समावेश आहे.  याशिवाय हवाई प्रवाशांकडूनही काही साठा जप्त करण्यात आला. याशिवाय ३५० किलो पेक्षा जास्त कोकेन. ज्याची आंतरराष्ट्रीय अवैध बाजारपेठेत ३,५०० कोटी रुपये किंमत आहे, ते डीआरआयने जप्त केले होते, ज्यात एप्रिल २०२१ मध्ये तुतिकोरिन बंदरातील कंटेनरमधून जप्त केलेला ३०३ किलो कोकेन साठ्याचा समावेश आहे.

Related posts

देशी बियाणांपासून बाप्पाची मूर्ती साकारत दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Voice of Eastern

एकवीरा देवी, खंडोबा मंदिरासह आठ मंदिरांचे सरकार करणार जीर्णोद्धार

मुंबईमध्ये मलेरिया, गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये वाढ

Voice of Eastern

Leave a Comment