Voice of Eastern

मुंबई :

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विविध उपक्रम राज्यभरात राबविण्यात येत आहे. रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती करण्यासाठी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शनही करण्यात येत आहे. दारू पिऊन नशेच्या अंमलाखाली वाहने चालविली जाऊ नयेत, अपघातांची व अपघाती मृत्यूंची रोखणे या उद्देशाने अशा वाहनचालकांची ब्रेथलायझर उपकरणाद्वारे तपासणी करण्याकरीता ड्रंक अँड ड्राईव्ह प्रतिबंधात्मक मोहीम राबविण्यात आली. यामध्ये ३३९ वाहनचालकांची ब्रेथलायझर उपकरणाद्वारे तपासणी करण्यात आली.

या मोहिमे अंतर्गत आरटीओ व वाहतूक विभागातील अधिकारी यांनी सायन सर्कल, सुमन नगर चौक, एडवर्ड नगर, अमर महल चौक चेंबूर, एलबीएस रोड घाटकोपर, विक्रोळी, देवनार, मानखुर्द शिवाजी नगर चौक आदी ठिकाणी वाहनचालकांची ब्रेथलायझर उपकरणाद्वारे तपासणी करण्यात आली. ही मोहिम ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान सायंकाळी ७ ते रात्री ११.३० या दरम्यान राबविण्यात आली. यावेळी दुचाकी, ऑटोरिक्षा, टॅक्सी, मालवाहतूक करणारे हलके वाहन, अवजड वाहन व बसचालकांची तपासणी करण्यात आली.

दारू पिऊन वाहने चालविल्यास निश्चितपणे अपघात होऊन मृत्यूमुखी पडण्याची सर्वात जास्त शक्यता असल्याने वाहनचालकांनी नशेच्या अंमलाखाली वाहने चालवू नयेत. पुढील काळातही ब्रेथलायझर उपकरणाद्वारे तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी दारूच्या अंमलाखाली वाहने चालवू नये, असे आवाहन प्रादे‍शिक परिवहन अधिकारी विनय अहीरे यांनी केले आहे.

५५६ वाहनचालकांची आरोग्य तपासणी

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वाहनचालकांची विनाशुल्क नेत्र व आरोग्य तपासणी करण्यात आली. प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) येथे आयोजित या तपासणी शिबिरात ५५६ वाहनचालकांची तपासणी झाली. तपासणी केलेल्या वाहनचालकांमध्ये ४२ वाहनचालकांना मोतिबिंदू, ३८ वाहनचालकांना रेटीना संबंधित व्याधी, दूर व निकट दृष्टीदोष ५८ वाहनचालकांना आणि दूर किंवा निकट दृष्टीदोष १०९ वाहन चालकांमध्ये आढळून आला. ज्या वाहनचालकांना दृष्टीदोष आढळून आला आहे, अशा १५९ वाहन चालकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत विनाशुल्क चष्मे पुरविण्यात आले आहे. आरोग्य तपासणीमध्ये रक्तदाब असलेले वाहनचालक ५० व रक्तातील साखरेचे कमी – अधिक प्रमाण असलेले ३८ वाहनचालक आढळून आले आहे.

Related posts

मिठी नदी मलजल शुद्धीकरणाकडे मुंबई महानगरपालिकेचे यशस्वी पाऊल

नांदेडमधील वैद्यकीय अध्यापकांचा एल्गार, १४ मार्चपासून रुग्णसेवा बंद

अल्टीमेट खो-खो सीझन २ : तेलुगू योद्धासचा ओडिशा जगरनॉट्सवर निसटता विजय

Leave a Comment