Voice of Eastern

ठाणे :

सामनावीर ठरलेल्या अजय जयस्वालची शतकी खेळी आणि उपयुक्त गोलंदाजीमुळे एफटीएल क्रिकेट क्लबने स्पीड स्पोर्ट्स क्लबचा सात विकेट्सनी दणदणीत पराभव करत ज्ञानराज स्पोर्ट्स कमिटी आयोजित डीएससीए चषक मर्यादित ४५ षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेतली विजयाची मालिका कायम राखली आहे.

भिवंडीतील सोनाळे मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना स्पीड स्पोर्ट्स क्लबने ३० षटकात १६९ धावसंख्येपर्यत मजल मारली. त्यांचा आदित्य गंगारे कमनशिबी ठरला. शतकाच्या उंबरठ्यावर असताना आदित्य ९२ धावांवर बाद झाला. मुकुलने २५ धावांचे योगदान दिले. या दोघांचा अपवाद वगळता इतर फलंदाज धावा करण्यात अपयशी ठरले. नवीन शर्माने ७ षटकात एका निर्धाव षटकासह ३३ धावांत ३ विकेट्स मिळवल्या. अजय आणि आकाश पाठकने प्रत्येकी १८ धावांत २ फलंदाज बाद केले. उत्तरादाखल अजयच्या १०० आणि नविन शर्माच्या ४५ धावांच्या खेळीमुळे एफटीएल क्रिकेट क्लबने २१ व्या षटकात ३ फलंदाजांच्या मोबदल्यात २१ व्या षटकात १७० धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले.

संक्षिप्त धावफलक :

स्पीड स्पोर्ट्स क्लब : ३० षटकात सर्वबाद १६९ ( आदित्य गंगारे ९२, मुकुल २५, नविन शर्मा ७-१-३३-३, अजय जयस्वाल ३-१-१८-२, आकाश पाठक ५-२-१८-२) पराभूत विरूद्ध

एफटीएल क्रिकेट क्लब : २१ षटकात ३ बाद १७० ( अजय जयस्वाल १००, नविन शर्मा ४५, अनजित ४-१-८-१, सुर्यदेव सिंग १-०-१-१) सामनावीर – अजय जयस्वाल.

Related posts

राज्य सेवा (मुख्य) परीक्षा अंतिम निकाल जाहीर

Voice of Eastern

‘प्रोटॉन बीम थेरपी’ कर्करोगावरील सर्वात अचूक उपचार – डॉ.अनिल डी’क्रूझ

वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी समर इंटर्नशिप प्रोग्राम

Leave a Comment