ठाणे :
युनियन क्रिकेट क्लबने पॅब क्रिकेट क्लबचा आठ विकेटसनी दणदणीत पराभव करत डीएससीए चषक मर्यादित ४५ षटकांच्या लेदर बॉल वासंतिक क्रिकेट स्पर्धेत मोठा विजय नोंदवला.
ज्ञानराज स्पोर्ट्स कमिटी आयोजित स्पर्धेतील सामन्यात पॅब क्रिकेट क्लबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांना फायदेशीर ठरला नाही. त्यांच्या कैफ शेख आणि शिवम मिश्राने प्रत्येकी १६ धावा संघाला ९७ धावापर्यंत मजल मारुन दिली. अष्टपैलू कामगिरी करतांना मित समानी, श्री सुदामे आणि साहिल गुप्ताने प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या. त्यानंतर युनियन क्रिकेट क्लबने २१ व्या षटकात दोन फलंदाजांच्या मोबदल्यात ९८ धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले. प्रथम ब्रम्हानंदनने नाबाद २५ आणि मित समानीने नाबाद १७ धावा केल्या. मित जैनने ३८ धावांची खेळी केली. अष्टपैलू कामगिरीसाठी मित समानीला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
संक्षिप्त धावफलक :
पॅब क्रिकेट क्लब : ३३ षटकात सर्वबाद ९७ ( कैफ शेख १६, शिवम मिश्रा १६, मित समानी ८-२-१६-२, श्री सुदामे ७-१-१५-२, साहिल गुप्ता ४-०-२२-२) पराभूत
युनियन क्रिकेट क्लब : २१ षटकात २ बाद ९८ ( प्रथम ब्रम्हानंदन नाबाद २५, मित जैन ३८, मित समानी नाबाद १७, कैफ शेख ५-०-१८-१, शिवम गुप्ता ५-०-३५-१).