Voice of Eastern

ठाणे :

ज्ञानराज स्पोर्ट्स कमिटी आयोजित डीएससीए चषक मर्यादित षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेतील विजयाची मालिका एफटीएल क्रिकेट क्लबने कायम राखली आहे. स्पर्धेत दुसर्‍यांदा सामनावीराचा पुरस्कार मिळवणार्‍या अजय जयस्वाल आणि मनोज पांडेंची अर्धशतकी खेळी, नविन सिंग, आकाश पाठकच्या गोलंदाजीमुळे एफटीएल क्रिकेट क्लबने स्वप्निल रौल्ल क्रिकेट क्लबचा ९५ धावांनी पराभव करत बाद फेरीच्या दिशेने आगेकूच केली.

कर्णधार आणि संघ प्रशिक्षक स्वप्निल रौल्लचा नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांना फलदायी ठरला नाही. स्पर्धेतील दुसरे शतक पूर्ण करण्यात अपयशी ठरलेल्या अजय जयस्वालने ९७ आणि मनोज पांडेने ६४ धावांची अर्धशतकी खेळी करत संघाच्या ३७ षटकात ९ बाद २६० धावसंख्येत मोलाचे योगदान दिले. विकास पांडेने २१ धावा केल्या. कर्णधार स्वप्नीलने ४८ धावांत ३, विकास राय आणि प्रविण बुटेरेने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. उत्तरादाखल स्वप्निल रौल्ल क्रिकेट क्लबचा डाव ३० षटकात १६५ धावांवर आटोपला. फलंदाजीत उपयुक्तता दाखवताना स्वप्निलने ३२, वेदांत पाठकने २२ आणि राज के ने २५ धावा केल्या. नविन सिंगने ३९ धावांत ४ तर आकाश पाठकने १२ धावांत ३ विकेट्स मिळवत संघाचा विजय निश्चित केला.

संक्षिप्त धावफलक :

एफटीएल क्रिकेट क्लब : ३७ षटकात ९ बाद २६० ( अजय जयस्वाल ९७, मनोज पांडे ६४, विकास पांडे २१, स्वप्निल रौल्ल ८-१-४८-३, विकास राय २-०-१७-२, प्रविण बुटेरे ७-०-४३-२) विजयी विरुद्ध

स्वप्निल रौल्ल क्रिकेट क्लब : ३० षटकात सर्वबाद १६५ ( स्वप्निल रौल्ल ३२, वेदांत पाठक २२, राज के २५, नविन सिंग ८-०-३९-४, आकाश पाठक ३-०-१२-३) सामनावीर – अजय जयस्वाल.

Related posts

हिवताप, डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ कायम 

राज्यातील गर्भवती, स्तनदा माता व बालकांची माहिती एका क्लिकवर मिळणार

Voice of Eastern

घरगुती गणपती देखाव्यातून दिला वृक्षसंवर्धनाचा संदेश

Voice of Eastern

Leave a Comment