ठाणे :
प्रकाश जैस्वालच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर यजमान ज्ञानराज स्पोर्ट्स कमिटी संघाने ठाणे रायझिंग क्रिकेट अकॅडमीचा दोन विकेट्सनी पराभव करत मर्यादित ४५ षटकांच्या डीएससीए चषक लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत पहिला विजय नोंदवला. प्रकाशला या सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
प्रथम फलंदाजी करताना पुरुषोत्तम उपाध्येने ६० धावांची अर्धशतकी खेळी करत संघाच्या द्विशतकी धावसंख्येत मोलाचे योगदान दिले. संघाचा प्रशिक्षक आणि कर्णधार रोहन पवारने ३८ धावा केल्या. ठाणे रायझिंग क्रिकेट अकॅडमीने ४२.२ षटकात २०८ धावांचे आव्हान यजमान संघाला दिले. मंदार मिश्राने ३३ धावांत ३ तर प्रकाशने ४२ धावांत ३ फलंदाज बाद केले. निहाल झाने दोन आणि अभिषेक पांडे, फिरोज हाश्मीने प्रत्येकी एक विकेट मिळवली.
यजमान संघाने ३८.३ षटकात ८ बाद २०९ धावा करत विजय निश्चित केला. साहिल वाघने ५७ धावा करत संघाला विजयाच्या दिशेने नेले. प्रकाश जैस्वालने फलंदाजीतही छाप पाडताना ३८ आणि आर्यन पालांडेने ३३ धावा केल्या. भव्य गोर आणि बंटीने प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या.
संक्षिप्त धावफलक :
ठाणे रायझिंग क्रिकेट अकॅडमी : ४२.२ षटकात सर्वबाद २०८ ( पुरुषोत्तम उपाध्ये ६०, रोहन पवार ३८, मंदार मिश्रा ८- ३३- ३, प्रकाश जैस्वाल ७.२- ४२-३, निहाल झा ६-२४-२) पराभूत विरुद्ध
ज्ञानराज स्पोर्ट्स कमिटी : साहिल वाघ ५७, प्रकाश जैस्वाल ३८, आर्यन पालांडे ३३, भव्य गौर ५- २४- २, बंटी ६.३- ३२- २) सामनावीर – प्रकाश जैस्वाल.