Voice of Eastern

ठाणे :

शशांक जाधव आणि ऋषि लोखंडेच्या जादूई स्पेलच्या जोरावर डाटाफ्रेंड्स क्रिकेट क्लबने आशिष क्रिकेट अकॅडमी ऑफ एक्सलन्स संघाचा आठ विकेट्सनी दणदणीत पराभव करत ज्ञानराज स्पोर्ट्स कमिटी आयोजित मर्यादित ४५ षटकांच्या डीएससीके चषक वासंतिक क्रिकेट स्पर्धेत मोठा विजय नोंदवला.

नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा आपल्या कर्णधाराचा निर्णय शशांक आणि ऋषिने आपल्या भेदक गोलंदाजीने सार्थ ठरवला. प्रतिस्पर्धी आशिष क्रिकेट अकॅडमी ऑफ एक्सलन्स संघाला ८४ धावांत गुंडाळताना शशांकने तीन षटकात दोन निर्धाव षटके टाकत २ धावांमध्ये तीन फलंदाजांना बाद केले. शशांकला तेवढीच तोलामोलाची साथ देताना ऋषीने ११ धावांत ३ फलंदाजांना माघारी पाठवले. सुयश घाडगेने दोन विकेट्स मिळवल्या. रोहनने २६ धावा केल्या. या छोट्या आव्हानाला सामोरे जाणाऱ्या डाटाफ्रेंड्स क्रिकेट क्लबला निलेश भारद्वाजने झटपट दोन विकेट्स मिळवत अडचणीत आणले होते. पण विकी पाटीलने नाबाद ३९ आणि ओमकार रहाटेने नाबाद १८ धावांची खेळी करत नवव्या षटकात २ बाद ८८ धावा करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. शशांकला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

संक्षिप्त धावफलक :

आशिष क्रिकेट अकॅडमी ऑफ एक्सलन्स : २० षटकात सर्वबाद ८४ ( रोहन २६, प्रज्वल १४, शशांक जाधव ३-२-२-३, ऋषी लोखंडे ३-०-११-३, सुयश घाडगे ४-०-१४-२) पराभूत विरुद्ध

डाटाफ्रेंड्स क्रिकेट क्लब : ८ षटकात २ बाद ८८ ( विकी पाटील नाबाद ३९, ओमकार रहाटे नाबाद १८, निलेश भारद्वाज ३-१-११-२) सामनावीर – शशांक जाधव.

Related posts

अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीला ५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

तलवार योग्य वेळी गाजवली, चालवली व फिरवलेली आहे

Voice of Eastern

संगीतप्रेमींच्या मनाचा ठाव घेणार ‘सावरल्या वाटा’

Leave a Comment