Voice of Eastern

मुंबई :

दिल्ली पोलिसांनी महिला डॉक्टरांसह अन्य डॉक्टरांवर केलेल्या लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या नीट परीक्षा तातडीने घ्यावी यासाठी राज्यातील निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या मार्डने राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयातील ओपीडी, विभागीय काम, वार्डमधील काम आणि काही मोजक्या शस्त्रक्रिया ३० डिसेंबरपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या नीट परीक्षेची समुपदेशन फेरीला न्यायालयाने १ फेब्रुवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. त्याविरोधात दिल्लीसह विविध राज्यातील डॉक्टर शांतपणे निषेध नोंदवत असताना दिल्ली पोलिसांनी महिला डॉक्टरांसह अन्य डॉक्टरांवर क्रूरपणे लाठीचार्ज केला. त्याचा निषेध करण्यासाठी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या नीट परीक्षा तातडीने घ्यावी यासाठी राज्यातील निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या मार्डने राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयातील ओपीडी, विभागीय काम, वार्डमधील काम आणि काही मोजक्या शस्त्रक्रिया ३० डिसेंबरपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनामध्ये डॉक्टर आपल्या जीवाची काळजी न करता रुग्णसेवा करत होते. रुग्णांच्या तुलनेत डॉक्टरांची संख्या अपुरी असल्याने डॉक्टरांवर अतिरिक्त ताण येत असूनही निवासी डॉक्टर आपली सेवा चोख बजावत होते. त्यातच यावर्षीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या नीट परीक्षेच्या समुपदेशन फेरीला न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने न्यायालयाने समुपदेशन फेरीला १ फेब्रुवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. कोरोनाचा सामना करताना डॉक्टर कमी पडत असताना या स्थगितीमुळे अनेक डॉक्टर सेवेपासून दूर राहतील. परिणामी आता सेवेत असलेल्या डॉक्टरांवर अधिक ताण पडण्याची शक्यता डॉक्टरांकडून वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे फॉरडा, आरडीए, आयएमए आणि मार्डकडून आंदोलने करण्यात येत आहेत.

Related posts

आतुरता ‘ती’च्या आगमनाची

पीआरएन चुकलेल्या विद्यार्थ्यांना सुधारित गुणपत्रिका मिळणार

Voice of Eastern

राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण झपाट्याने वाढताहेत

Leave a Comment