Voice of Eastern

मुंबई : 

आयआयटी मुंबईमध्ये मास्टर्सच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या २७ वर्षीय विद्यार्थ्याने सोमवारी पहाटे साडेचार वाजता आत्महत्या केली. होस्टेलच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून त्याने आपले जीवन संपवले.

वसतिगृहातील सर्व विद्यार्थी झोपलेली असताना पहाटे साडेचारच्या सुमारास या विद्यार्थ्यांने सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. त्याला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. पोलिसांना घटनास्थळावरून सुसाइड नोट सापडली असून, त्यात त्याने आत्महत्येला कोणालाही जबाबदार ठरवलेले नाही. हा निर्णय त्याने नैराश्येतून घेतला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

Related posts

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक : प्राध्यापक संघटनांचा प्रचार सुरू

Voice of Eastern

स्टेट बँकेच्या भोंगळ कारभारामुळे अनेक एसटी कर्मचारी वेतनापासून वंचित

Voice of Eastern

पुनर्मुल्यांकन प्रक्रियेअभावी विद्यापीठाचे कोट्यवधींचे नुकसान

Leave a Comment