Voice of Eastern
आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमीशहर

एक डोस घेतलेल्या लोकांना आता काही प्रमाणात सूट मिळण्याची शक्यता-राजेश टोपे

banner

नुकतेच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोविद १९ च्या १ डोस घेतलेल्या लोकांनां सवलती मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. राज्यात कोरानाच प्रादुर्भाव पाहता सध्या बर्याच गोष्टी सुरु कण्याच्या सूचना राज्यचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी दिल्या आहेत. पण यात काही प्रमाणात बंधनं देखील आहेत, आता एक डोस घेतलेल्या लोकांना देखील आता काही प्रमाणात सूट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अंतिम निणर्य टास्क फोर्स सोबत बसून हा अंतिम निणय घेतला जाऊ शकतो असे देखील राजेश टोपे म्हणाले.

हे पण वाचा – लवकरच महाविद्यालय होणार सुरु

राज्यात ब्रेक द चैन या मोहिमेअंतर्गत बऱ्याच गोष्टी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. घट स्थापनेच्या शुभ मुहूर्तावर राज्यातील सर्व मंदिर कोविद नियम पाळून भाविकांसाठी सुरु करण्याचा निणय घेतला होता. या सोबतच आता येत्या २० ऑक्टोबर पासून राज्यातील सर्व महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय देखील घेतला आहे. राज्यात मॉल्स, मंदिर व इतर सर्व ठिकाण सुरु करण्याचा निणय घेतला जरी असला तरी अनेक नागरिकांचा फक्त एक डोस पूर्ण असल्याने अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. महत्वाचं म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या डोस मधला ८४ दिवसांचा मोठा अंतर असल्याने त्रास सहन करावा लागत आहे. या साठीच लवकरच राज्याच्या टास्क फोर्स सोबत विचार विमर्श करून अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो असे मत राज्यचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले.

हे पण वाचा – नागरिकांच्या लसीकरणावर भर

राज्यात दसरा दिवाळी हा सण येत्या काही दिवसात साजरा होणार आहे. या दरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र कोरोना रुग्ण संख्या नियंत्रण मध्ये असल्यास हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याचे टोपे यांनी वर्तवली आहे.

Related posts

कोविड-१९ दरम्यान आहार पौष्टिक घटकांनी संपन्न असावा

मानखुर्द-शिवाजी नगरला टीबीचा विळखा; आरोग्य केंद्राच्या माध्यमातून युवासेनेचा विशेष उपक्रम

‘टाइम बेबी’साठी रिताभरी चक्रवर्तीचा खास लूक

Leave a Comment