Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशहर

महाराष्ट्रातील एनएसएसच्या आठ विद्यार्थ्यांचा पथसंचलनासाठी राजपथवर सराव

banner

नवी दिल्ली : 

७३ व्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणार्‍या पथसंचलनासाठी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्यावतीने एनएसएस सराव शिबिराला येथील चाणक्यपुरी भागातील इंटरनॅशनल यूथ होस्टेलमध्ये १ जानेवारीपासून सुरुवात झाली. कडाक्याच्या थंडीत दिल्लीच्या ऐतिहासिक राजपथावर आणि करिअप्पा परेड ग्राऊंडवर महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजनेचे आठ विद्यार्थी-विद्यार्थीनी सराव करीत आहेत. देशभरातील १५ विभागांमधून १५० एनएसएसचे विद्यार्थी-विद्यार्थीनी या शिबिरात सहभागी झाले आहेत. पश्चिम (पुणे) विभागात समावेश असणार्‍या महाराष्ट्रातून ४ विद्यार्थी आणि ४ विद्यार्थीनी तर गोव्यातून प्रत्येकी १ विद्यार्थी आणि १ विद्यार्थीनी असे १० विद्यार्थी-विद्यार्थीनी शिबीरात सराव करीत आहेत.

दरवर्षी महाराष्ट्रातून १४ तर देशभरातून २०० विद्यार्थी-विद्यार्थीनी राजपथावरील पथसंचलनात सहभागी होतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा राज्यातून फक्त आठ तर देशभरातून १५० विद्यार्थी-विद्यार्थीनींचा सहभागी झाले आहेत. हे शिबीर ३१ जानेवारीपर्यंत चालणार असून यामध्ये दररोज सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रभातफेरी, योगासने, बौद्धिकसत्र, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पथसंचलनाचा सराव करण्यात येतो अशी माहिती महाराष्ट्राच्या चमुचे समन्वयक तथा गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील केवळरामजी हरडे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. पवन नाईक यांनी दिली. १ ते १५ जानेवारीपर्यंत सकाळी व सायंकाळी जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर पथसंचलनाचा सराव चालला, तर १६ जानेवारीपासून सकाळी राजपथावर आणि सायंकाळी करिअप्पा परेड ग्राऊंडवर पथसंचलन सराव सुरु असल्याचे डॉ. नाईक यांनी सांगितले. या शिबिरात प्रत्येक राज्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम साजरा होतो. १८ जानेवारी रोजी ‘महाराष्ट्रदिन’ साजरा झाला. महाराष्ट्राच्या चमुने तयार केलेले खास डिजीटल निमंत्रणपत्र, राज्याची संस्कृती दर्शविणारा व राष्ट्रीय एकात्मतेसह विविध सामाजिक संदेशांच्या वैशिष्ट्यांनी नटलेला बहारदार कार्यक्रम सादर झाला.

प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पथसंचलनासाठी एकूण १५० पैकी १०० विद्यार्थी विद्यार्थीनींची निवड करण्यात येणार आहे. त्यात महाराष्ट्र व गोव्यातील सर्वच म्हणजे १० विद्यार्थी-विद्यार्थीनीची निवड होईल, असा विश्वास डॉ. पवन नाईक यांनी व्यक्त केला. प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पथसंचलनात गेल्या एका दशकापासून राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे नेतृत्व करण्याचा बहुमान महाराष्ट्राच्या सोपान मुंडे, खूशबु जोशी,आसीफ शेख आणि दर्पेश डिंगर यांनी मिळविला आहे.

Related posts

रेल्वे क्रॉसिंगच्या दरम्यान धडक झाल्याने पुद्दुचरी एक्स्प्रेसचे तीन डबे घसरले

Voice of Eastern

ब्रिटिश नॅशनल अवॉर्ड्समध्ये शेखर कपूरचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्काराने गौरव

Voice of Eastern

भारतात माता मृत्यू दर १० अंकांनी घटला; महाराष्ट्रात १५ टक्क्यांपेक्षा जास्त घट

Leave a Comment