मुंबई :
दोन महिन्यापासून लैगिंग अत्याचार करून त्याचा व्हिडीओ बनवून तिला ब्लँकमेल करणाऱ्या दोघांना बांगूर नगर पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
अटक केलेले दोघे आरोपी २१ ते २२ वयोगटातील असून पीडित मुलगी अवघ्या १३ वर्षाची आहे. पीडिता आणि आरोपी हे मालाड पश्चिम बांगूर नगर परिसरात राहणारे आहेत. दोन महिन्यापूर्वी या दोघांनी दुपारच्या वेळी पीडित मुलीला घरी बोलावून तिच्यावर लैगिंग अत्याचार करत त्याचा व्हिडीओ बनवला. त्यानंतर दोन महिन्यापासून ते दोघे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर आळीपाळीने लैगिंग अत्याचार करीत होते. या दोघांच्या कृत्याला कंटाळून अखेर तिने हा प्रकार आपल्या आईवडिलांना सांगितला. मुलीवर दोन महिन्यापासून होणाऱ्या लैगिंग अत्याचारामुळे पालक हादरले. त्यांनाही थेट बांगूर नगर पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून या दोन्ही तरुणांना अटक करून त्याच्याविरुद्ध लैगिंग अत्याचार आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला.