Voice of Eastern
ताज्या बातम्या मोठी बातमी शहर

मुंबईसह राज्यात उभारणार इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन

banner

मुंबई :

पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक व्हेईकल धोरणाअंतर्गत मुंबई महापालिकेने एरोकेअर क्लीन एनर्जी यांच्या संयुक्त प्रयत्नाने महालक्ष्मी, हाजीअली, केशवराव खाड्ये मार्गावर उभारण्यात आलेल्या मुंबईसह देशातील पहिल्या अन्न कचऱयापासून निर्मित विजेवर इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशनचे लोकार्पण राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.

फूड वेस्टमधून निर्मित विजेचा उपयोग करुन इलेक्ट्रिक व्हेईकल चार्ज करणारे भारतातील हे पहिलेच केंद्र आहे. अशा स्वरुपाचे केंद्र मुंबईतच नव्हे तर राज्यातील शक्य त्या ठिकाणी उभारण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. विशेषतः महामार्गांवर त्याचा प्राधान्याने विचार केला जाईल. त्यातून विद्युत वाहनांच्या वापराला चालना तर मिळेलच, सोबत सेंद्रिय, जैविक स्वरुपाच्या कचऱयाचे योग्य व्यवस्थापन देखील होईल, असे मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

हाजी अली परिसरात केशवराव खाड्ये मार्गावर माँसाहेब स्व. सौ. मीनाताई ठाकरे उद्यानाजवळ महापालिकेने वाया गेलेल्या अन्नापासून (फूड वेस्ट) वीजनिर्मिती प्रकल्प उभा केला आहे. या प्रकल्पाचा शुभारंभ पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सप्टेंबर २०२१ मध्ये करण्यात आला होता. तेव्हापासून आतापर्यंत सुमारे दीड लाख किलोपेक्षा अधिक टाकून दिलेल्या अन्नपदार्थांवर प्रक्रिया करुन वीजनिर्मिती करण्यात आली आहे.

या प्रकल्पातून तयार होणारी वीज आता विद्युतभारित वाहनांसाठी अर्थात इलेक्ट्रिक व्हेईकलसाठी उपयोगात येणार आहे. या वीजनिर्मिती प्रकल्पाला जोडून इलेक्ट्रिक व्हेईकल फास्ट चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहे. या ठिकाणी चार्जिंगसाठी दोन पॉईंट असून एकावेळी दोन वाहने आणि तेही जलद गतीने चार्ज होवू शकतात. माफक दरात ही चार्जिंग सुविधा उपलब्ध असेल.

Related posts

दुसरा डोस घेण्याकडे मुंबईकरांचे दुर्लक्ष

Voice of Eastern

महाराष्ट्रातील जैवविविधता यंदा राजपथावर दिसणार

Voice of Eastern

असे असेल पेट परीक्षेचे नवे वेळापत्रक

Voice of Eastern

Leave a Comment