Voice of Eastern

मुंबई : 

स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्ताने साजरा होणार्‍या युवादिनाचे औचित्य साधून मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये व्यसनमुक्तीचा एल्गार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचार्‍यांना ‘Say No To Drugs-Yes To Life’चा संदेश देत व्यसनमुक्ती राहण्याची शपथ जिल्हाधिकार्‍यांनी दिली.

केंद्र शासनाचा नशामुक्त भारत अभियान हा उपक्रम १५ ऑगस्ट २०२० पासून देशातल्या २७२ जिल्ह्यांमध्ये राबविला जात आहे. व्यसनमुक्तीच्या कार्यास बळकटी देऊन प्रचार, प्रसार, प्रबोधन वाढीस लावून व्यसनमुक्तीकडे वाटचाल करण्यासाठी हा उपक्रम राबविला जातो. बुधवारी युवा दिनानिमित्त मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन वंदन करण्यात आले. व्यसनांत अडकलेल्यांनी व्यसनांच्या विळख्यातून कसे बाहेर पडता येईल याची जिवंत उदाहरणे पथनाट्याच्या माध्यमातून सादर केली. मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी उपस्थितांशी संवाद साधताना प्रामुख्याने आपल्या देशात युवकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे प्रत्येकाने मी स्वतः व्यसनमुक्त राहीन व इतरांनीही व्यसनमुक्त करेन, व्यसनात अडकलेल्यांना समुपदेशन, उपचार पध्दतीच्या माध्यमातून व्यसनमुक्त राहण्याचा संकल्प करत असल्याची शपथ उपस्थितांना दिली. कार्यक्रमादरम्यान नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यच्या वतीने व्यसनमुक्ती पोस्टर्सचे प्रदर्शन मांडून व्यसनमुक्तीमय वातावरण निर्मिती केली होती. कार्यक्रमाची प्रस्तावना व भूमिका नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी मांडली.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, जिल्हाधिकारी मुंबई शहर, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण विभाग, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबई झोनल युनिट, अमली पदार्थ विरोधी कक्ष मुंबई पोलिस, सलाम मुंबई फाऊंडेशन, कृपा फाऊंडेशन, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत व्यसनमुक्ती संकल्प ‘Say No To Drugs – Yes To Life’ हा कार्यक्रम ऑनलाईन पार पडला.

Related posts

आयडॉलच्या प्रवेशास ३० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Voice of Eastern

काकडी आणि खिर्‍याच्या निर्यातीत भारत ठरला अव्वल

Voice of Eastern

विद्यार्थ्यांनी वैद्यकीय शिक्षणासाठी महाराष्ट्राला प्राधान्य द्यावे अशी स्थिती निर्माण करा – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

Leave a Comment