महाड :
महाड तालुक्यातील अपंगांना शासकिय निधी व योजनांचा लाभ मिळावा यासाठी गेल्या ६ महिन्यापासून प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या वतीने पाठपुरावा सुरु असून त्यांना त्यांचा लाभ मिळत नसल्याने प्रहार संघटनेतील दिव्यांग बांधवानी आज महाड पंचायत समितीवर आंदोलन करत बिरवाडी ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला.
प्रहार अपंग क्रांती संस्था हि राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली सदर संस्था उभी राहिली आहे. या संस्थेच्या माध्यमातून महाड पंचायत समितीवर ग्रामपंचायतींच्या कारभाराविरोधात मोर्चा काढण्यात आला. दिव्यांगांना शासकीय निधी व योजनेचा लाभ मिळवून देताना ग्रामपंचायत विभाग चालढकल करत असल्याने अपंगा पर्यंत विविध योजना व निधी पोचत नसल्याचे सांगून हा धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी कोकण प्रांत अध्यक्ष सुरेश मोकल, मुंबई जिल्हा अध्यक्ष विशाल वाघमोडे, रायगड जिल्हा कमिटी, पनवेल तालुका उपाध्यक्ष प्रकाश पाटील, माणगांव तालुका अध्यक्ष पांचाल, महाड तालुकाध्यक्ष फैज हुर्जुक आदी पदाधिकारी उपस्थित होते.
महाड तालुक्यातील बिरवाडी ग्रामपंचायत गेली कांही वर्ष दिव्यांगाना एकूण उत्पन्नातून देण्यात येणारा निधी देत नसल्याची तक्रार यावेळी करून सदर निधीत गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप केला. यामुळे जोपर्यंत या निधीचा घानादेश मिळत नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही अशी भूमिका फैज हुर्जुक आणि इतर पदाधिकार्यांनी घेतली. ५ % निधी तत्काळ देवून संबंधित ग्रामसेवकावर कारवाई करावी अशी मागणी देखील प्रहार संघटने मार्फत केली. यावेळी विजय मोरे, रमा चौगले, रेशमा मोरे, काकासाहेब सावरे, शिवाजी कांबळे, प्रकाश पाटील, राजेंद्र पांचाल, भरत भुईर, मेहबूब अतार, सचिन सुतार, मोहसिन दरेखान, सनिल जंगम, इम्रान कोंडेकर, राजेंद्र शिंदे, इम्रान सावंत, धनंजय शिंदे, छाया पारदुले, मंजूशा साबळे, सबरिन ईसाने, आलिया धामणकर, शबनूर पटेल, आफरी आलेकर, मंगेश महाडीक, महेश सुतार, शशिकांत जाधव, आदि उपस्थित होते.