Voice of Eastern

नांदेड : 

नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील अध्यापकांनी गुरुवारी महाविद्यालय परिसरात निदर्शने करून त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी परत एकदा एल्गार केला. १४ मार्च २०२२ पासून अत्यावश्यक सेवा व covid-19 रूग्ण सेवा वगळता इतर कामावर बहिष्कार टाकण्याचे ठरले असल्याचे संघटनेचे सचिव डॉ. मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले.

मागील आठवड्यापासून सुरू असलेले आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर आले असून शासनाकडून कुठलीही ठोस भूमिका घेतली नसल्यामुळे आणि विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनामध्ये सुद्धा तारांकित प्रश्न उपस्थित केला असता माननीय मंत्री महोदय वैद्यकीय शिक्षण यांच्याकडून कुठलाही निर्णय त्यांनी जाहीर न केल्यामुळे आता हे आंदोलन तीव्र होत असल्याचे संघटनेचे अध्यक्ष डॉ.संजय मोरे यांनी सांगितले. आंदोलनांमध्ये महाविद्यालयातील सर्व अध्यापक सहभागी झाले होते सर्वांनी १४ मार्चपासून कामावर बहिष्कार टाकण्याचे ठरवले आहे. त्याप्रमाणे रुग्णांची गैरसोय होईल त्याबद्दल खेद व्यक्त केला असून शासनाने लवकरात लवकर निर्णय घेतला तर हे आंदोलन मागे घेण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे. आंदोलनाचे नेतृत्व महाविद्यालयातील डॉ. जे. बी. देशमुख, डॉ. हेमंत गोडबोले, डॉ. पंकज कदम, डॉ. किशोर राठोड, डॉ. अरविंद चव्हाण यांनी केले होते

Related posts

मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे मुक्त प्रवासासाठी बोटसेवा सुरु करा; कोकणवासीयांची मागणी

Voice of Eastern

ज्येष्ठ समाजसेवक, निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 

अतिवृष्टीमुळे २० जुलैच्या परीक्षा २६ व ३१ जुलैला होणार

Voice of Eastern

Leave a Comment