मुंबई
सार्वजनिक असंरोग्य विभागातील तब्बल ६ हजार २०५ विविध पदांसाठी येत्या २५ आणि२६ सप्टेंबर रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षांमधील गैरप्रकार टाळण्यासाठी संशयितांचे कॉल रेकॉर्ड तपासण्यात येणार आहेत.
आरोग्य विभागातील गट क संवर्गातील २ हजार ७३९ आणि गट ड संवर्गातील ३ हजार ४६६ पदांसाठी भरती प्रक्रीया सुरु आहे. राज्यातील दीड हजार केंद्रांवर एकाचवेळेस परीक्षा घेतली जाईल. उत्तर पत्रिकांची तपासणी संगणक प्रणालीद्वारे होईल. काही जिल्ह्यांमध्ये काही व्यक्ती परीक्षेबाबत गैरप्रकार करीत असल्याचे आढळून आले आहे. अशा व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासून पाहाण्याच्या सूचना पोलिसांना दिल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. उमेदवारांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षेला उपस्थित राहावे आणि कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये, असे आवाहन टोपे यांनी केले आहे.