Voice of Eastern

मुंबई : 

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे दागिन्यांचे प्रदर्शन भरण्यासाठी सोने व्यापाऱ्याने कारखान्यातून ८ कोटीचे सोन्याचे दागिने आणले. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रदर्शन रद्द झाले. त्यामुळे दागिने विक्रीसाठी कार्यालयात ठेवण्यात आले. हीच संधी साधून नोकराने कार्यालयातील कोटींचे दागिने लंपास केले.

डिसेंबरमध्ये वांद्रे कुर्ला संकुलात दागिन्यांचे प्रदर्शन होते. त्यामुळे टामका यांनी गोरेगावमधील कारखान्यातून वेगवेगळ्या डिझाईनचे ८ कोटी ११ लाखांचे दागिने आणि ८ लाख ५७ हजारांची रोकड असा एकूण ८ कोटी १९ लाख ६७ हजारांचा ऐवज तिजोरीत आणून ठेवला. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रदर्शन रद्द करण्यात आले. त्यामुळे टामका यांनी दागिने व्यापाऱ्यांना देण्यासाठी तिजोरीतच ठेवले. या तिजोरीची चावी नोकर गणेश आणि टामका यांच्याकडे होती. १४ जानेवारीला टामका सकाळी कार्यालयात आले असता त्यांना दरवाजा उघडा दिसला. आत जाऊन पाहिले असता, तिजोरीतील दागिने, रोकड असा एकूण ८ कोटी १९ लाख ६७ हजारांचा ऐवज गायब होता. टामका यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा प्रयत्न केला असता त्याचा डीव्हीआर गायब होता. तसेच  गणेशचा फोन बंद येत असल्यामुळे कार्यालयाच्या बाहेरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये त्यांना गणेश आणि त्याचा मित्र रमेशकुमार प्रजापती यांनी तिजोरीतील दागिने तीन बॅगमध्ये भरून नेताना दिसले. टामका यांनी तातडीने लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून गणेशाचा शोध सुरू केला आहे. त्यासाठी पोलिसांचे विशेष पथक राजस्थानला रवाना झाले आहे.

ताडदेव येथे राहणारे सोन्याचे व्यवसायिक खुशाल टामका यांचा गोरेगाव येथे सोन्याचे दागिने बनवून देण्याचा कारखाना आहे. तसेच भुलेश्वर येथे त्यांचा कारखाना आहे. टामका यांच्याकडे गणेश हिरामण कुमार (२१) हा ६ महिन्यापूर्वी रुजू झाला. गणेश दागिन्यांची डिझाईन दाखवून इतर व्यापाऱ्याकडून ऑर्डर घेत असे. काही महिन्यात गणेशने मालकाचा विश्वास संपादन केला होता. त्यामुळे त्यांच्यावर टामका यांनी कार्यालयाची जबाबदारी सोपवली होती. गणेश कार्यालयातच राहत असे.

Related posts

म्हाडा भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Voice of Eastern

बारावी परीक्षेचा अर्ज या तारखेपासून भरण्यास होणार सुरुवात

राज्यातील १७०० डॉक्टर बंधपत्राशिवाय सेवेपासून वंचित

Leave a Comment