Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशहर

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास मुदतवाढ

banner

मुंबई : 

महाराष्ट्र् लोक सेवा आयोगामार्फत घेण्यात येणार्‍या महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ आणि दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा २०२१ या दोन्ही परीक्षांना अर्ज करण्यास तसेच शुल्क सादर करण्यास १७ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. संकेतस्थळात तांत्रिक बिघाड झाल्याने अर्ज भरण्यात येत असलेल्या अडचणींसंदर्भात विद्यार्थ्यांकडून आलेल्या तक्रारींची दखल घेऊन एमपीएससीने विद्यार्थ्यांना मुदतवाढ देत दिलासा दिला आहे.

महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत घेण्यात येणार्‍या महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेला अर्ज व शुल्क भरण्यासाठी १३ जानेवारी तर दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा २०२१ साठी अर्ज व शुल्क करण्यासाठी १५ जानेवारी अंतिम मुदत होती. संकेतस्थळावरील तांत्रिक बिघाडामुळे उमेदवारांना अर्ज करण्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी एमपीएससीकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी महाराष्ट्र लोक सेवा आयोगाकडून या दोन्ही परीक्षेंचे अर्ज व शुल्क भरण्यास १७ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसे परीक्षा देऊ इच्छिणार्‍या उमेदवारांना १९ जानेवारीपर्यंत चलनाची सुधारित प्रत संकेतस्थळावरून घेता येणार असून, बँकेमध्ये चलनाद्वारे शुल्क भरण्यासाठी २० जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे एमपीएससीची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

Related posts

गोदावरी खोऱ्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी वळविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मार्डच्या पूर्वकल्पनेमुळे रुग्णसेवेवर परिणाम नाही

Voice of Eastern

आता Meta वर भेटा

Voice of Eastern

Leave a Comment