Voice of Eastern

मुंबई :

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ३९० विविध पदांसाठी घेण्यात येणार्‍या पूर्व परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. २५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्यास असलेली मुदत वाढवून ती ३१ ऑक्टोबरपर्यंत केली आहे. त्यामुळे या परीक्षेला अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ३९० पदांसाठी २ जानेवारी २०२२ रोजी राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित केली जाईल. या ३९० पदांमध्ये उपजजिल्हाधिकारी १२, पोलीस उपअधीक्षक १६, सहकार राज्य कर आयुक्त १६, गटविकास अधिकारी १५, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-अ १५, उद्योग उप संचालक ४, सहायक कामगार आयुक्त २२, उपशिक्षणाधिकारी २५, कक्ष अधिकारी ३९, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी ४, सहायक गटविकास अधिकारी १७, सहायक निबंधक सहकारी संस्था १८, उपअधीक्षक भूमि अभिलेख १५, उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क १, उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क १, सहकारी कामगार अधिकारी ५४, मुख्याधिकारी गट ब ७५, मुख्याधिकारी गट अ१५पदे, उपनिबंधक सहकारी संस्था गट अ १० पदांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे.

Related posts

युवादिनी मुंबईत गुंजला व्यसनमुक्तीचा एल्गार

सेंट जॉर्जेस रुग्णालयात होणार थॅलेसेमियाग्रस्त मुलांसाठी मोफत रक्त तपासणी शिबिर

Voice of Eastern

बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्याचे भाजपचे स्वप्न हे स्वप्नच राहणार – महेश तपासे

Leave a Comment