Voice of Eastern

मुंबई :

कोणत्याही चोरीच्या घटनेमध्ये चोराला पोलिसांकडून अटक केली जाते. मात्र गोरेगावमध्ये घडलेल्या एका घटनेत चोरांनी ज्या कारखान्यात सोन्याची चोरी केली, त्या कारखान्याच्या मालकालाच पोलिसांनी अटक केली आहे. या मालकाला बोरिवली लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

जयंता दास याच्या मालकीचा गोरेगाव परिसरात सोन्याचे दागिने पॉलिश करण्याचा कारखाना आहे. या कारखान्यात आठ कामगार कामाला असून त्यात संजय विश्वनाथ दुलई आणि अनिल शशिधर मुखर्जी हे दोघे कामाला होते. अनिल कारखान्यात तर संजय हा खार येथे राहतो. काही दिवसांपूर्वी जयंताने या दोघांना काही सोन्याचे दागिने पॉलिश करण्यासाठी दिले होते. यावेळी कारखान्यातून सोन्याची पावडर कमी होत असल्याने जयंताच्या लक्षात आले. त्याने कारखान्यातील सीसीटिव्ही फुटेजची तपासणी केली असता या दोघांनी सोन्याची पावडर चोरी केल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या जयंताने संजय आणि अनिल या दोघांना कारखान्यात सहा दिवस कोंडून ठेवले. तसेच त्यांच्याकडून पैसे वसुलीसाठी सात लाखांच्या धनादेशावर सह्या घेतल्या. त्यानंतर अनिलच्या पत्नीला दागिने आणण्यास प्रवृत्त केले होते. हा प्रकार अनिलच्या नातेवाईकांना समजताच त्यांनी दिडोंशी पोलिसात तक्रार केली. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत तपासाचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी कारखान्यात छापा टाकून अनिल आणि संजय यांची सुटका केली. यावेळी जयंताने दिलेल्या तक्रारीवरुन या दोघांविरुद्ध चोरीचा तर नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरुन जयंता दासविरुद्ध दिडोंशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच या तिघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या तिघांनाही न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अनिल आणि संजयने अडीचशे ग्रॅम सोन्याची पावडर चोरी केल्याचा आरोप जयंताने केला होता तर या दोघांनी फक्त पन्नास ग्रॅम पावडर चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

Related posts

रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याऐवजी पालिकेच्या तिजोरीवर पदपथाचा खड्डा : भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांचे टीकास्त्र

Voice of Eastern

ऑनलाईन बैठकीबाबत कुलगुरूंविरोधात राज्यपालांकडे तक्रार

परतीच्या पावसामुळे शेतकरी हवालदिल; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने भरपाई द्यावी

Leave a Comment