Voice of Eastern

मुंबई :

धारावीतील टी जंक्शन सिग्नल जवळील रस्त्यावर नवरंग कंम्पाऊंडमध्ये 24 डिसेंबरला राज्य उत्पादन शुल्क विभागाने अचानक छापा घालून मोठ्या प्रमाणात विदेशी मद्य जप्त केले. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाने विदेशी मद्याबरोबरच, लेबले, बुचे, ड्रायर मशीन, असे ३ लाख ७० हजार ३९० किमतीचे साहित्य जप्त केले.

आपल्या ओळखीच्या लोकांना करण्याचा उद्देशाने धारावीमध्ये काही व्यक्ती विविध मद्याच्या उच्च प्रतीचे विदेशी मद्य, भारतीय बनावटीचे विदेशी मद्य, विविध ब्रँडच्या मद्याचा साठा स्वतः जवळ बाळगून विक्री करणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी 24 डिसेंबरला छापा घातला. या छाप्यात १६५ विविध प्रकारच्या विदेशी मद्याच्या रिकाम्या बाटल्या, ११७ विविध प्रकारच्या विदेशी मद्याची बुचे, १२६ विविध प्रकारच्या विदेशी मद्याच्या टोप्या (कॅप्स), ४० अँबसेल्यूट व्होडकाचे टोपन, विविध ब्रॅन्डच्या विदेशी मद्याची लेबले, एक ड्रायर मशीन, तीन टोचे, तीन फनी, एक मार्कर, तीन टूथ ब्रश, एक बॅग सँग व १२ मोठ्या प्लॉस्टिक गोण्याचा इत्यादी साहित्यासह एकूण रुपये ३ लाख ७० हजार ३९० रुपये किंमतीचा दारुबंदी गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्यामध्ये कल्पेश वाघेला यास महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत तिघा आरोपींना अटक करण्यात आली. या आरोपींना २५ डिसेंबरला न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना २८ डिसेंबरपर्यंत एक्साईज कोठडीचे आदेश दिले आहेत. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्काचे आयुक्त कांतीलाल उमाप, ठाणे विभागीय उप आयुक्त सुनिल चव्हाण तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सी. बी. राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्रमांक २ यांनी कारवाई केली.

अवैध बनावट मद्य निर्मिती, वहातूक, विक्री यासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास या विभागाच्या टोल फ्री क्र. १८०० ८३३ ३३३३ व व्हॉटस अप क्र. ८४२२००११३३ संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी केले आहे.

Related posts

‘आपले सरकार महाऑनलाईन’ संकेतस्थळ पूर्ववत न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

३१व्या राष्ट्रीय किशोर/किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत हरियाणाला दुहेरी मुकुट

महाराष्ट्र आणि कॅनडा यांच्यात सामंजस्य करार; राज्यात विविध क्षेत्रात मोठी गुंतवणूक होणार

Leave a Comment