Voice of Eastern

मुंबई

उत्पादनावर व कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिरातीसंदर्भातील आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करणे दोन कंपन्यांना चांगलेच महागात पडले आहे. गायनोप्लस कॅप्सूल या औषधाच्या लेबलवर ‘महिलांची बंद झालेली मासिक पाळी नियमित करते, तर व्हिरूलिना या आयुर्वेदिक औषधांच्या लेबलवर आणि संकेतस्थळावर श्वसनसंस्थेशी संबंधित आक्षेपार्ह मजकूर आढळल्याने या दोन्ही औषधांच्या कंपन्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) न्यायालयात धाव घेतली. या दोन्ही प्रकरणात न्यायलयाने कंपन्यांना आर्थिक दंड ठोठावला आहे.

अन्न व औषध प्रशासनाने या जाहिरात देणााया औषध कंपन्याविरोधात न्यायलयात खटला दाखल केला. या खटल्यात तीन कंपन्यांविरोधात न्यायालयाने आर्थिक दंड आकारला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या नियमानुसार, मासिक पाळी तसेच ीवसनासंबंधी आजारांबाबत माहिती देण्यास औषधे व जादूटोणावादी (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९२५ नुसार बंदी आहे.
इंदोरच्या मे. नॅल्को बायोटॅक, मे. लॉईड फार्माक्युटीकल्स आणि मुंबईतील मे. क्रिस्टल हेल्थकेअर या कंपनीच्या ‘गायनोप्लस कॅप्सूल’ या औषधांच्या लेबलवर ‘महिलांची बंद झालेली मासिक पाळी नियमित करते’ अशी जाहिरात करण्यात आली होती. अशा प्रकारची जाहिरात करणे हे आषधे व जादुटोणादी कायदा १९५४ व नियमाचे उल्लंघन करणारे असल्याने एफडीएचे औषध निरीक्षक ए.ए. रासकर व पी.एन. चव्हाण यांनी या कंपन्यांविरोधात शिवडी न्यायालयात दोन खटले दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी होऊन न्यायालयाने मे. नॅल्को बायोटॅक या कंपनीचे मालक दिलीप बुर्‍हानी यांना दोन्ही खटल्यात ४० हजारांचा दंड ठोठावला. तर, मे. क्रिस्टल हेल्थकेअरचे मालक गौरव शहा आणि मे लॉईड फार्माक्युटीकल्सचे संचालक देवेंद्र खत्री यांना प्रत्येकी २० हजारांचा दंड न्यायालयाने ठोठावला. त्याचप्रमाणे व्हिरुलिना पाऊडर या आयुर्वेदिक औषधाच्या लेबलवर व उत्पादक नॅचरल सोल्यूशन्सच्या संकेतस्थळावर श्वसनसंबंधी आक्षेपार्ह मजकूर आढळून आला. हा मजकूर आषधे व जादुटोणादी कायदा १९५४ व नियमाचे उल्लंघन करणारा असल्याने नॅचरल सोल्यूशनचे मालक अनिलकुमार शर्मा व युगंधर फार्माचे मालक योगिता केळकर यांच्याविरुद्ध शिवडी न्यायालयात खटला दाखल केला होता. या खटल्यात या दोन्ही कंपन्यांच्या मालकांना प्रत्येकी १० हजारांचा दंड आकारण्याचे निर्देश न्यालयाने दिले.

मासिक पाळी असा उल्लेख असलेली कोणत्याही माध्यमातील जाहिरात ही कायद्याने गुन्हा ठरते. श्वसनासंबंधी औषधांच्या जाहिरातींवरही अन्न व औषध प्रशासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे लोकांनी या जाहिरांपासून सावधान रहा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त (औषधे) जी. बी. ब्याळे यांनी केले.

Related posts

रायगड, रत्नागिरीमधील नद्यांचे पाणी इशारा पातळीवर; नागरीकांना सतर्कतेचा इशारा

एप्रिलमधील उन्हाच्या तडाख्याने घेतला २० पक्ष्यांचा बळी

अभियांत्रिकीचे प्रवेश वाढले; रिक्त जागा घटल्या

Voice of Eastern

Leave a Comment