Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशिक्षण

आंदोलनाच्या भीतीने मुंबई विद्यापीठाने युवासेना सिनेट सदस्यांना ठेवले दूर

banner

मुंबई :

आयडॉलच्या ५२ वा वर्धापन दिन २४ मार्चला राज्यपालांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला. मात्र यावेळी मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांना दूर ठेवण्यात आले. कोरोनाचे कारण देत ऑनलाईन लिंकद्वारे उपस्थित राहण्याच्या सूचना देऊन त्यांना प्रत्यक्ष कार्यक्रमाबाबत अनभिज्ञ ठेवल्याचा आरोप युवासेना सिनेट सदस्यांकडून करण्यात येत आहे. कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित राहिल्यावर कार्यक्रम प्रत्यक्षात असल्याचे लक्षात आल्यावर सिनेट सदस्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई विद्यापीठात युवासेना व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यामध्ये अनेकवेळा वाद निर्माण झाले आहेत. नुकतेच राज्यपालांना छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्द अपमानकारक वक्तव्य केल्याबद्दल सिनेट सदस्यांकडून नुकत्याच झालेल्या अधिसभेत राज्यपालांचा निषेध करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आयडॉलच्या वर्धापन दिनी युवासेनेकडून राज्यपालांविरोधात निषेध करण्यात येईल, अशी भीती विद्यापीठ प्रशासनाला वाटत होती. त्यामुळेच सिनेट सदस्यांना ऑनलाईन कार्यक्रमाचे आमंत्रण दिले. तसेच या कार्यक्रमाबाबत मुंबई विद्यापीठ व आयडॉलकडून जाणीवपूर्वक गुप्तता बाळगण्यात आल्याचा आरोप सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी केला. आयडॉलचा वर्धापन दिन हा ऑनलाईन नव्हे तर प्रत्यक्ष होणार असल्याचे आम्हाला कळवले असते तर आम्ही कुलपतींना छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा भेट देऊन विद्यापीठात स्वागत केले असते, असेही सावंत यांनी सांगितले. तसेच राज्यपाल तथा कुलपती हे युवासेनेच्या सिनेट सदस्यांना घाबरत असल्याने त्यांनी आयडॉलच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत त्यांना थांगपत्ताही लागू दिला नसल्याची खरमरीत टीका राज्यपाल नियुक्त युवासेनेचे सिनेट सदस्य अ‍ॅड. वैभव थोरात यांनी केली.

मुंबई विद्यापीठाच्या सर्व सिनेट सदस्यांना निमंत्रण पत्रिकाही ऑनलाईन पाठवली होती. कोणालाही दूरध्वनीद्वारे कार्यक्रमाबाबत कळवण्यात आले नव्हते. असे असतानाही युवासेनेचे सिनेट सदस्य महादेव जगताप, राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी आणि सुरेश मैंद हे उपस्थित होते, अशी माहिती आयडॉल प्रशासनाकडून देण्यात आली.

Related posts

बीए एमएमसी सत्र ६ परीक्षेचा निकाल जाहीर

Voice of Eastern

पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास जिंकू – जयंत पाटील

आता दरवर्षी शाळांमध्ये १० सप्टेंबरला साजरा होणार आजी आजोबा दिन

Leave a Comment