Voice of Eastern

पनवेल महानगरपालिका स्वीप-२०२१ च्या उत्सव मतदार साक्षरता नोंदणी व जनजागृती अभियानाअंतर्गत, विषयाच्या अनुशंगाने मतदार नोंदणीविषयी जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम, चर्चासत्र, जिंगल मेकिंग, अशा सामाजिक संदेश देणाऱ्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचा बक्षिस वितरण सोहळा ३० डिसेंबर २०२१ रोजी आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात पार पडला.

मतदार यादीत नावनोंदणीसाठी स्वदेशी तुझे सलाम या डिजिटल माध्यमाने देखील जनतेला आवाहन केले होते. मराठी कलाकारांचे या जनजागृतीविषयीच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्वदेशी तुझे सलामने पनवेल महानगरपालिकेच्या या अभियानासाठी आपले महत्वपूर्ण डिजीटल व्यासपीठ उपलब्ध करुन दिले. या कार्यासाठी स्वदेशी तुझे सलामच्या साईली प्रशांत भाटकर यांचा सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

सरकार कोणत्याही पक्षाचे असो, परंतु सरकार हे जनसामान्यांसाठी असते, मतदानाचा हक्क बजावणे तसेच त्यासाठी आपली मतदार यादीत नावनोंदणी करणे हे एक सुजाण नागरिक म्हणून आपले परम कर्तव्य आहे. असा उदात्त हेतु यामागे स्वदेशी तुझे सलामचा होता. स्वदेशी तुझे सलाम हे डिजीटल व्यासपीठ अशाच समाजपयोगी कार्यांसाठी कायम अग्रेसर असते. साईली भाटकर, सुजित विजयन, पुजा डांगे, अक्षय लुडबे ही टीम स्वदेशी तुझे सलामच्या माध्यमातून जनजागृतीविषयी अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते. कोविड काळात भारतीय अर्थव्यवस्थेला अप्रत्यक्षरित्या अर्थसहाय्य म्हणून, रोजच्या वापरात जास्तीत जास्त स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचे आवाहन स्वदेशी तुझे सलाम सातत्याने डिजीटल माध्यमातून करत असते.

पनवेल महानगरपालिकेच्या स्वीप-2021 अभियानाअंतर्गत आयोजित या बक्षीस वितरण सोहळ्याला पालिकेचे उपआयुक्त (मुख्यालय) विठ्ठल डाके, सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपआयुक्त सचिन पवार, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखने, सहाय्यक आयुक्त डॉ. वैभव विधाते, निवडणूक विभागप्रमुख सदाशिव कवठे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ उपस्थित होते. तसेच या संपूर्ण अभियानाची संकल्पनेची रचना आणि मार्गदर्शन हे पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी केले. एक माणूस म्हणून आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो, ही जाणीव एखाद्या व्यक्तीला असणे अंतत्य महत्वाचे असते अशीच जाणीव उराशी बाळगून स्वदेशी तुझे सलामसह इतर अनेक सामाजिक संस्थांचा सन्मान या सोहळ्यात करण्यात आला.

तुम्ही नोटाला मतदान केलेत तरी निवडणुक आयोगाची काही हरकत नसते तो मतदाराचा वैयक्तिक प्रश्न असतो, परंतु मतदानाचा हक्क न बजावता, मतदार यादीत नावनोंदणी न करता, सरकारवर टीकेचे ताशेरे ओढण्याचा कोणालाही हक्क नाही. तुम्ही जर मतदान करत असाल, मतदार यादीत तुमचे नाव असेल, तरचं तुम्हाला सरकार निवडण्याचा तसेच निवडणूकीत मतदानाद्वारे निवडून आलेल्या सरकारच्या कार्याविषयी बोलण्याचा अधिकार असतो. त्यामुळे देशाचे एक सुजाण नागरिक म्हणून आणि सुयोग्य उमेदवार निवडून सरकार निर्मितीमध्ये सहभागी होणे आपले कर्तव्य आहे आणि ते सर्वांनी बजावले पाहिजे.
-विठ्ठल डाके, उपआयुक्त

Related posts

रस्ते अपघातात डोळ्याच्या दुखापतींकडे अधिक लक्ष देणे गरजेचे – नेत्रतज्ज्ञांचे आवाहन

Voice of Eastern

अमृता फडणवीस यांचे गाणे आता मराठी चित्रपटातही

Voice of Eastern

पाऊस की थंडी; मुंबईकर हैराण

Voice of Eastern

Leave a Comment