Voice of Eastern

मुंबई

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला फारच विलंब झाला. मात्र आगामी वर्षातील शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख राज्य परीक्षा परिषदेकडून जाहीर करण्यात आली आहे. इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २० फेब्रुवारी २०२२ रोजी होणार आहे. परीक्षेचा पहिला पेपर सकाळी ११ ते १२.३० दरम्यान तर दुसरा पेपर दुपारी १.३० ते ३ दरम्यान होणार आहे.

 

शाळांमधून २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, ८ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा त्याचबरोबर विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा ही संपूर्ण राज्यातून एकाच वेळी घेण्यात येते. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील शिष्यवृत्ती परीक्षा २० फेब्रुवारीला सकाळी होणार आहे. परीक्षेला प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत नियमित शुल्कासह ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. त्यानंतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. परीक्षा शुल्क व प्रवेश शुल्क असे मिळून २०० रुपये इतके शुल्क आहे. मागास व दिव्यांग विद्यार्थ्यांना शुल्कात सवलत देण्यात आली असून, त्यांच्यासाठी हे शुल्क १२५ रुपये एवढे असणार आहे. विद्यार्थ्यांना शुल्क हे ऑनलाईन पद्धतीनेच भरायचे आहे. इच्छुक विद्यार्थ्यांसाठी www.mscepune.in आणि https://mscepuppss.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून दिले आहेत. तसेच परीक्षेसंदर्भातील सविस्तर माहिती याच संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली.

 

पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या दोन्ही प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाचे असणार आहेत. प्रत्येक पेपरसाठी ए,बी,सी,डी संचाच्या प्रश्नपत्रिका देण्यात येतील. ही परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांचे पालक महाराष्ट्रात किमान १५ वर्षे वास्तव्यास असणे अपेक्षित आहे. ही परीक्षा मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलुगु आणि कन्नड या सात माध्यामातून घेण्यात येणार आहे.

Related posts

महाराष्ट्र डिजीटल विद्यापीठाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री

Voice of Eastern

बाप्पाच्या स्वागतासाठी मंडळं सज्ज

Voice of Eastern

राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेसाठी मुंबईच्या ५ प्रकल्पांची निवड

Leave a Comment