मुंबई :
किमान वेतन द्या, भविष्य निर्वाह निधी व पेन्शन द्या, ब्रेक देणे बंद करा, नैमित्तिक रजा, प्रवासभत्ता, गटविमा योजना, सेवेत कायम करावे अशा विविध मागण्यांसाठी मुंबई महापालिकेत सेवेत असलेल्या चार हजार आरोग्यसेविकांनी ८ मार्च या आंतरराष्ट्रीय महिला दिनापासून बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाविरुद्ध लढा जिंकल्यानंतर आता आरोग्य सेविकांनी कायदेशीर मागण्यांसाठी लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. ८ मार्च या आंतरराष्ट्रीय महिला दिनापासून मुंबई महापालिकेत सेवेत असलेल्या चार हजार आरोग्यसेविकांनी किमान वेतन द्या, भविष्य निर्वाह निधी व पेन्शन द्या, ब्रेक देणे बंद करा या प्रमुख तीन मागण्यांसह अन्य आठ मागण्यांसाठी आझाद मैदानात बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मागण्यांसाठी वारंवार आंदोलन करूनही पालिकेकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत बेमुदत आंदोलन करण्याचा निर्धार आरोग्य सेविकांनी घेतला आहे. अशी माहिती महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ऍड प्रकाश देवदास यांनी दिली