Voice of Eastern

मुंबई : 

सामुहिक सहभागातून लोकशाहीतील प्रत्येक मताचे महत्त्व विशद करण्याकरिता भारत निवडणूक आयोगाने ‘माझे मत माझे भविष्य-एका मताचे सामर्थ्य’ या मध्यवर्ती संकल्पेवर आधारित मतदार जागृती स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्वीपद्वारे मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग कार्यक्रमांतर्गत निवडणूक आयोग हा नेहमीच लोकांच्या प्रतिभा आणि सर्जनशीलतेचा वापर करून लोकशाही बळकट करत असतो.

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त भारत निवडणूक आयोगाने मतदार जागृती स्पर्धेचे आयोजन केले आहे. यात एकूण पाच प्रकारच्या स्पर्धा आहेत. यात प्रश्नमजुंषा स्पर्धा, गीत गाण्याची स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, भित्तिचित्र आणि व्हिडिओ तयार करण्याची स्पर्धेचा समावेश आहे. ही स्पर्धा सर्व वयोगटासाठी असून प्रवेशिका १५ मार्चपर्यंत स्वीकारण्यात येतील. गीत स्पर्धा, व्हिडिओ मेकिंग स्पर्धा आणि भित्तिचित्रे स्पर्धेकरिता श्रेणी ठरविण्यात आली असून संस्थात्मक श्रेणीअंतर्गत शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे अशा राज्य किंवा केंद्र सरकारच्या नोंदणीकृत संस्थांना या संस्थात्मक श्रेणीमध्ये भाग घेता येईल. व्यावयायिक श्रेणीअंतर्गत ज्या व्यक्तिचे उदरनिवार्हाचे मुख्य स्त्रोत गायन, व्हिडिओ मेकिंग, भित्तीचित्र असा आहे, अशी व्यक्ती व्यावसायिक श्रेणीत गणली जाईल. हौशी श्रेणीअंतर्गत गायन, व्हिडिओ मेकिंग, भित्तिचित्र हा छंद म्हणून करत असलेली व्यक्ती हौशी म्हणून गणण्यात येईल.

घोषवाक्य स्पर्धेकरिता प्रथम पारितोषिक २० हजार रूपये, द्वितीय पारितोषिक रूपये १० हजार, तृतीय पारितोषिक रूपये ७ हजार पाचशे तसेच सहभागी होणार्‍यापैकी ५० स्पर्धकांना प्रत्येकी २ हजार रूपये उल्लेखीनय पुरस्कार म्हणून देण्यात येणार आहे. प्रश्नमंजुषा स्पर्धेकरिता भाग घेणार्‍या विजेत्यांना भारतीय निवडणूक आयोगाचे नाव असलेल्या आकर्षक वस्तू देण्यात येणार असून तीसरी पातळी पूर्ण करणार्‍या सर्व स्पर्धकांना ई-प्रमाणपत्रे देण्यात येतील. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तसेच स्पर्धेचे नियम, अटी यांच्या माहितीसाठी स्पर्धेचे संकेतस्थळ http://ecisveep.nic.in/contest/ ला भेट द्यावी. प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी स्पर्धा संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच सर्व प्रवेशिका voter-contest@eci.gov.in या ईमेलवर पाठवाव्यात तसेच ईमेल करताना स्पर्धेचे नाव आणि श्रेणी याचा विषयात उल्लेख करावा, असे भारत निवडणूक आयोगाने कळविल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली आहे.

Related posts

सीमेवरील सैनिकांना दिव्यांग विद्यार्थ्यांनी पाठविल्या ५०० राख्या

आदिवासी क्रांतिकारकांवर अधिक संशोधन करण्याची गरज – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

वैद्यकीय शैक्षणिक साहित्य आता डिजीटल रुपात!

Voice of Eastern

Leave a Comment