Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशिक्षण

विद्यार्थ्यांच्या उपोषणाची पाच दिवसांने घेतली दखल; उदय सामंत यांनी दिले बैठकीचे आश्वासन

banner

मुंबई : 

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची अकार्यक्षम कार्यप्रणाली, महाविद्यालयीन प्रश्नासंदर्भात वारंवार तक्रार करून करण्यात येणारे दुर्लक्ष, नियमबाह्य कार्यप्रणाली व गुन्हेगारी पद्धतीने महाविद्यालय ताब्यात घेणार्‍या प्राचार्यांना देण्यात येणारे अभय याविरोधात आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन संघटनेच्या वतीने १६ ऑक्टोबरपासून सुरू केले होते. मात्र त्याकडे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांच्याकडून दुर्लक्ष करण्यात येत होते. मात्र २० ऑक्टोबरला महाविद्यालयेन सुरू करताना अखेर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आंदोलनाची दखल घेत २१ ऑक्टोबरला संघटनेच्या सदस्यांसोबत मंत्रालयात बैठक घेण्याचे जाहीर केले. तसेच उच्च व तंत्र शिक्षण संचालकांना विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत चौकशी करण्याच्या सूचनाही दिल्या.

२०१७ पासूनच्या विद्यार्थी हिताच्या प्रलंबित मागण्यांकडे विद्यापीठाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर विद्यार्थी हित धुडकावून शिक्षण क्षेत्रातील काही गुन्हेगारी आणि विद्यार्थ्यांची लूटमार करणार्‍या प्राचार्यासोबत संगनमत करून मुंबई विद्यापीठ प्रशासनाच्या नियमांना धाब्यावर बसवत आहेत. यासंदर्भात विद्यार्थ्यांकडून होणार्‍या तक्रारींवर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर हे तुमच्या तक्रारींसाठी माझ्याकडे वेळ नाही. मला अन्य कामेही आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांशी निगडीत प्रश्न सोडवण्यासाठी कुलगुरूंकडे वेळ नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा किंवा विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवावेत यासाठी आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन संघटनेच्या वतीने १६ ऑक्टोबरपासून मुंबई विद्यापीठामध्ये आंदोनल सुरू केले होते. मात्र विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी व संघटनेच्या कार्यकर्त्यांना विद्यापीठात प्रवेश करण्यापासून अडवले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळच आंदोलन सुरू केले. प्रवेशद्वाराबाहेर असलेल्या जागेत रात्रीचे विषारी साप फिरत असल्याने ती जागा विद्यार्थ्यांसाठी धोकादायक होती. मात्र विद्यार्थ्यांनी सावधानता बाळगत आपले आंदोलन कायम ठेवले. विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारे कुलगुरू हे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून राहण्यासाठी योग्य नसल्याचे मत आंबेडकर स्टूडंट्स असोसिएशनचे अध्यक्ष सचिन मनवाडकर यांनी सांगितले. महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील परिस्थिती हाताळण्यात कुलगुरू व कुलसचिव हे पूर्णपणे अयशस्वी ठरल्याने संविधानिक पध्दतीने उपोषणास बसण्याशिवाय दुसरा पर्याय नाही असे मत संघटनेचे प्रवक्ता आनंदराज घाडगे यांनी व्यक्त केले. कुलगुरू आणि कुलसचिव यांनी नियमानुसार दोषीं महाविद्यालय व प्राचार्यांवर प्रशासकीय कार्यवाही करावी त्याचबरोबर अनेक प्रलंबित तक्रारीवर ठोस कारवाई व्हावी यासाठीच हे उपोषण आहे असे आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशनचे उपाध्यक्ष दिलीप रणदिवे यांनी सांगितले.

मंत्री उदय सामंत यांनी साधला संवाद

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आंदोलनाची दखल घेऊन २० ऑक्टोबरला दुपारी ३ वाजता आंदोलक विद्यार्थांची भेट घेतली. त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या आणि त्यासंदर्भात २१ ऑक्टोबरला मंत्रालयात बैठक घेणार असल्याचे जाहीर केले. उच्च व तंत्र शिक्षण संचालकांना विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत चौकशी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.सामंत म्हणाले, राज्यातील कुठल्याही विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी राज्य शासन तत्पर आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांविषयी सकारात्मक निर्णय घेऊ असेही सामंत यांनी सांगितले.

Related posts

सीईटी सेलच्या सुसंवाद मेळाव्याला विद्यार्थी, पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Voice of Eastern

मुंबई महापालिका शाळेत घडताहेत गणेश मूर्तिकार

धूम्रपान सोडण्यासाठी नागरिकांना मसिना हॉस्पिटल करणार मदत

Leave a Comment