Voice of Eastern
आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमी

रेल्वेच्या जगजीवन राम रूग्णालयात प्रथमच रोटाट्रिस्पी शस्त्रक्रिया यशस्वी

banner

मुंबई : 

मुंबई सेंट्रल येथील पश्चिम रेल्वेच्या जगजीवन राम रुग्णालयातील कॉर्डिओलॉजी टीमने पहिल्यांदाच रोटाट्रिस्पी प्रक्रिया (रोटेशनल एथेरेक्टॉमी आणि लिथोट्रिस्पी फुग्याचा वापर करून) यशस्वीरित्या पार पाडली. भारतीय रेल्वेमधील रुग्णालयात प्रथमच अशा प्रक्रारची प्रक्रिया करण्यात आली आहे.

जगजीवन राम रुग्णालयामध्ये उपचारासाठी आलेल्या ६९ वर्षीय व्यक्तीच्या छातीमध्ये सहा महिन्यांपासून दुखत होते, त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. या रुग्णांच्या तपासण्या केल्या असता त्याच्या उजव्या धमनीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम पसरल्याने रक्त प्रवाहात अडथळा निर्माण झाल्याचे दिसून आले. कॅल्शियमच्या तीव्रतेमुळे शस्त्रक्रियेवेळी सर्वात लहान फुगा आणि इंट्राव्हस्कुलर अल्ट्रसाऊंड कॅथेटर धमनीमध्ये जाणे शक्य होत नव्हते. इंट्राव्हास्कुलर अल्ट्रासाऊंडच्या मदतीने शरीराच्या प्रभावित भागाचा अभ्यास करून कॅल्शियमसारखे कठीण दगड रोटेशनल एथेरेक्टॉमीच्या मदतीने तोडले गेले. इंट्राव्हस्कुलर लिथोट्रिप्सीद्वारे कॅल्शियमचे दगड फोडून मार्ग तयार करण्यात आला. दोन योग्य नवीनतम ड्रग इल्युटिंग स्टेंट हदयाच्या रक्तवाहिनीमध्ये टाकण्यात आले. ही शस्त्रक्रिया चार कार्डिओलॉजिस्ट, दोन कार्डिओलॉजी रेजिडेंट, एक एनेस्थेसियोलॉजिस्ट, तीन कॅथ लॅब तंत्रज्ञ आणि ५ नर्सिंग स्टाफ यांच्या टीमने यशस्वीपणे पार पाडली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णामध्ये सुधारणा दिसून येत आहे.

रोटाट्रिस्पी प्रक्रिया ही कार्डिओलॉजीच्या क्षेत्राच्या तुलनेने नवीन आणि प्रगत कार्यक्षम शस्त्रक्रिया आहे. जी गंभीरपणे कॅल्सिफाइड कोरोनरी धमनी रोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी वापरली जाते. ही प्रक्रिया संपूर्ण भारतीय रेल्वेमध्ये जगजीवन राम रुग्णालयात प्रथमच करण्यात आली. ओपीएन बलूनच्या मदतीने अँजिओप्लास्टी करण्यासाठी भारतीय रेल्वेवरील पहिले ट्रान्स कॅथेटर एओर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट (टीएव्हीआर) देखील जगजीवन राम रुग्णालयात करण्यात आले, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

Related posts

कॅरम स्पर्धा : काजल कुमारी व अब्दुल रेहमान राष्ट्रीय विजेते

गुढीपाडव्यानिमित्त अनोखा ‘चैत्रोत्सव’; महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारी भव्य शोभायात्रा निघणार!

राज्यभरात सोमवारी ‘शिवस्वराज्य दिन’ साजरा होणार

Leave a Comment