Voice of Eastern

मुंबई :

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी स्थानिक प्रशासनाला अर्ज मागवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. त्यानुसार मुंबई महापालिकेकडे आतापर्यंत ५ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. मात्र यातील एक हजार अर्जदार पात्र ठरले असून, चार हजार अपात्र ठरले आहेत. पात्र अर्जदारांची यादी महापालिकेकडून राज्य सरकारकडे पाठवण्यात आली आहे. दरम्यान, अद्याही अर्ज येत असून, त्याची छाननी करून ते सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुबिंयांना राज्य सरकारने ५० हजारांची मदत करण्याचे जाहीर केले. यासाठी मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना ऑनलाईन अर्ज करण्यास सांगण्यात आले. मृत व्यक्तीच्या कुटुंबियांकडून आलेले अर्जांची स्थानिक स्वराज्य संस्थांकडून छाननी करून पात्र अर्ज राज्य सरकारकडे पाठवण्यात येत आहेत. पात्र ठरलेल्या अर्जदारांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहेत. मुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे १६ हजार ३६५ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांच्या कुटुंबियांनी आर्थिक मदत मिळावी यासाठी मुंबई महापालिकेकडे अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत मुंबई महापालिकेकडे ५ हजार अर्ज आले आहेत. या अर्जांची छाननी करून त्यातील अवघे एक हजार अर्ज पात्र ठरले असून, चार हजार अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत. पात्र ठरलेले एक हजार अर्ज मुंबई महापालिकेने राज्य सरकारकडे पाठवले असल्याचे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. पालिकेने मंजूर केलेल्या अर्जदाराच्या बँक खात्यात राज्य सरकार पैसे जमा करणार असल्याचे सांगण्यात आले.

Related posts

भारतीय संविधान घराघरात, मनामनात रुजणार! – प्रा.वर्षा गायकवाड 

मेट्रो स्थानकात पालिकेकडून मोफत लसीकरण

Voice of Eastern

ऐन गणपतीमध्ये अकरावी प्रवेशाची विशेष फेरी; विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजीचा सूर

Leave a Comment