Voice of Eastern

मुंबई

मित्र भेटले की नेहमीच मस्त गप्पा-टप्पा, मस्ती आणि जुन्या आठवणींची चांगलीच महफिल रंगात असते. मात्र मुंबईतल्या शिवडी येथील दारुखाना भागात एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. दोन मित्र एकत्र तर भेटले मात्र एकाने दुसऱ्याचा मोबाईल घेतल्याच्या संशयावरून मोठा वाद झाला. महत्वाचं म्हणजे वाद इतका मोठा झाला की जवळच जमिनीवर पडलेल्या लाकडी बांबूने त्या मित्राने दुसऱ्या मित्राच्या उजव्या पायाच्या नडगीवर झोरात फटके मारून  उजवा पाय फ्रॅक्चर केला व लाथ मारून खाली पडल्याने त्याच्या कपाळाला जखम केली. प्रमोद कुमार भारती असे याचे नाव असून सध्या जे जे रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे.

नेमकं झालं काय?

नेहमी प्रमाणे दोन मित्र एकत्र भेटले आणि गप्पा मारत होते. त्यातच एका प्रमोदने त्याचा मोबाईल घेतला असल्याच्या संशयवरून शिवीगाळ सुरू झाली. जवळच जमिनीवर पडलेल्या लाकडी बांबूने त्या मित्राने प्रमोदच्या उजव्या पायाच्या नडगीवर झोरात फटके मारून उजवा पाय फ्रॅक्चर केला व लाथ मारून खाली पडल्याने त्याच्या कपाळाला जखम झाली. प्रमोद वर सर जे जे रुग्णालयात उपचार घेत. तर त्याच्या मित्रावर कलम ३२६,३२३,५०४  भा.द.वि. अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.

या गुन्ह्याच्या अनुषंगाने पो उ नि अविनाश मोरे व गुन्हे प्रकटीकरण पथक हे दारूखाना परिसरात शोध घेत असताना भारत भुवन परिसरात फुटपाथ वर झोपलेल्या व्यक्तीकडे चौकशी करत असताना एक व्यक्ती संशयीतरित्या पळून जाऊ लागल्याने त्याचा पाठलाग करून त्यास शिताफीने पकडले व पोलीस ठाणेस आणून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचा या गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास अटक करण्यात आली.

संबंधित गुन्ह्याचा तपास सुरू आहे. लवकरच यावर गुन्ह्याचा तिढा सोडवला जाईल व आरोपींवर सक्त कारवाई करण्यात येईल अशी माहीत पोलीस,उप-निरीक्षक अविनाश मोरे यांनी दिली.

Related posts

दिवा पॅसेंजर नव्हे लेट पॅसेंजर!; दोन महिन्यात फक्त सहा वेळाचा धावली वेळेवर

मुंबईकरांनो समुद्रकिनारी जाताय सावधान; स्टिंग रे, जेलीफीशचा धोका वाढतोय

…म्हणून तिने मारले पोलीस बाबाला

Voice of Eastern

Leave a Comment