Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमी

श्रेयवादाच्या लढाई वरून घाटकोपरमध्ये महाविकास आघाडी मध्ये बिघाडी

banner

घाटकोपर :

श्रेय वादाचा लढाई वरून घाटकोपरमध्ये महाविकास आघाडी मध्ये बिघाडी झालेली पाहायला मिळाली . अमृत नगर ते घाटकोपर स्टेशन या मार्गावर 416 क्रमांकाची बेस्ट बस ची फेरी सुरू करण्यात आली होती परंतु अचानक आज सकाळपासून ही बेस्ट बस ची फेरी बेस्ट प्रशासनाकडून बंद करण्यात आली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी कडून या नव्या फेरीचे उद्घाटन सोमवारी करण्यात आलं होतं. मात्र शिवसेनेदेखील या श्रेयवादात उडी घेत पुन्हा उदघाटन करण्याचे ठरवले वही बससेवा बंद झाली यामुळे तिन्ही पक्षात वाद निर्माण झाला.

काय आहे प्रकरण

शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने बेस्ट आगारात फोन करून बेस्ट ची फेरी शिवसेनेने उद्घाटन केल्यानंतरच सुरू करावी अशी मागणी केली आणि मंगळवार सकाळपासून ही सेवा बंद करण्यात आली असा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केला . या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी थेट विक्रोळी बेस्ट आगार गाठून बेस्ट अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा बेस्ट बस ची फेरी सुरू करण्याची मागणी केली सुरुवातीला बेस्ट अधिकाऱ्यांनी तांत्रिक कारणामुळे ही बेस्ट बसची फेरी रद्द करण्यात आली असल्याचं सांगितलं परंतु अखेर कार्यकर्त्यांचा दबाव वाढल्यामुळे बेस्ट प्रशासनाला पुन्हा चारशे सोळा क्रमांकाची बेस्ट सेवा सुरु करावी लागली . अखेर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या बेस्ट बसमधून प्रवास करत घोषणाबाजी केली .

घाटकोपर ते अमृतनगर 416 ही बस सेवा सुरू व्हावी यासाठी स्वागत आहे राष्ट्रवादी प्रयत्न करण्यात आले होते. ही बस सेवा चालू देखील झाली. मात्र आज सकाळपासून ही बससेवा बंद करण्यात आली. जेव्हा आम्ही याचा जाब अधिकाऱ्यांना विचारण्यासाठी गेलो तेव्हा वेगळीच माहिती समोर आली. एका शिवसेनेच्या नेत्यांच्या सांगण्यावरून ही बस थांबवण्यात आली. त्यानंतर आम्ही पुन्हा ही सेवा सुरू केली आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबई सचिव राजू घुगे यांनी सांगितले.

Related posts

अखिल भारतीय मराठा महासंघ प्रणित “ऑल इंडिया कंझुमर फोरमचे” उद्घाटन!

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष : १० महिन्यांमध्ये ८ हजारांहून अधिक रुग्णांना मदत

तब्बल ४० वर्षांनंतर अलिबाग आणि उरण एकमेकांना जोडले जाणार

Leave a Comment