- घाटकोपर
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे तयारी सुरू झालेली आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातच नाहीतर देशभरात हे आता गणेशोत्सव साजरा होत आहे. भारताचे संरक्षण करणारे सैनिक सुद्धा आता गणेशोत्सव जल्लोषाने साजरी करतात भारत-पाक सीमेवर असलेल्या पूंछ जिल्ह्यामध्ये मराठा रेजिमेंट द्वारे दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो आणि या ठिकाणी गणेशाची मूर्तीही मुंबईतूनच जाते.
ज्या ज्या ठिकाणी मराठी माणूस आहे त्या ठिकाणी तर गणेशोत्सव साजरा होतोच होतो. भारत-पाक सीमेवर असलेल्या पूंछ जिल्ह्यामध्ये मराठा रेजिमेंट द्वारे दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. या ठिकाणी गणेशाची मूर्तीही मुंबईतूनच जात असते समाजसेविका ईशर शर्मा ह्या गेल्या सहा वर्षापासून मुंबईतूनच गणेश मूर्ती घेऊन पुछ जिल्ह्यामध्ये भारत पाकिस्तान सीमेवर जात असतात आणि त्या ठिकाणी दहा दिवस हा गणेश उत्सव सैनिकांसोबत उत्साहात साजरा करतात घाटकोपर मधून सिद्धिविनायक चित्र शाळेतून सकाळी रेल्वेने ही गणेशमूर्ती काश्मीर कडे रवाना रवाना झाली आहे. तत्पूर्वी याठिकाणी काश्मीर मध्ये ज्याप्रकारे सीमेवर हा गणेशोत्सव साजरा केला जातो त्याचा देखावाच याठिकाणी निर्माण केला आहे.
आपले सैनिक बांधव कठीण परिस्थितीत आपलं कर्तव्य भारताच्या सीमेवर बजावत असतात. अपघात अफगाणिस्तान मध्ये जी स्थिती निर्माण झालेली आहे ते सर्वांना माहिती आहेत आणि ज्या ठिकाणी ही मूर्ती चालली आहे त्या ठिकाणाहून 600 किलोमीटर वरती अफगाणिस्तान आहे. या ठिकाणी आम्ही जाऊन जल्लोषात गणेशोत्सव साजरी करतो त्यांचे मनोबल वाढवतो. पूर्ण दहा दिवस हा सण साजरा करतो असे ईशर शर्मा यांनी सांगितले आहे.