Voice of Eastern

मुंबई

अवघ्या १० दिवसांच्या बाप्पाच्या सेवेनंतर आज सर्व भाविक आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देणार. मुंबईतील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह घरगृती गणपतीचे आज विसर्जन सोहळा पार पडणार. आज अनंत चतुर्दशी निमित्त मुंबईसह देशभरात बाप्पाचा विसर्जन सोहळा पार पडणार. मुंबईत तब्बल १२ हजार पेक्षा अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं आहेत.

गेल्यावर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि भाविकांची काळजी पाहता मुंबईतील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपला उत्सव रद्द देखील करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या वर्षी भाविकांची काळजी घेत आणि शसांच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत उत्सव साजरा करण्यात आला. महत्वाचं म्हणजे दर वर्षी आपल्या उंच मूर्ती आणि भव्य दिव्य देखाव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील सर्वच गणेशोत्सव मंडळांनी अगदी साधेपणाने हा उत्सव साजरा करण्यात आला.

पुढच्या वर्षी लवकर या…

आपल्या लाडक्या गणरायाला आज जड अंत:करणाने निरोप दिला जाणार. गेले १० दिवस ज्या बाप्पाला आपण घरी आणले, ज्याची इतक्या मनोभावे पुजा केली, त्याला आज निरोप देताना नक्कीच आपले डोळे पाणावतील. मात्र, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, म्हणत ज्या बाप्पा आपण आज निरोप देऊ, तो बाप्पा पुढच्या वर्षी आपल्याला लवकरच भेटायला येणार आहे.  पुढीच्या वर्षी बुधवारी ३१ऑगस्ट, २०२२ रोजी पुन्हा आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार. त्यामुळे बाप्पा लवकरच आपल्याला पुन्हा दर्शन देणार आहे.

हे पण वाचाबाप्पाचा  लोकल प्रवास…

ऑनलाइन दर्शनाची सोय

लाखो भावीकांची श्रद्धा आणि भक्ती लक्षात घेता तसेच भाविकांची गर्दी टाळण्यासाठी मुंबईतील सर्वच गणेशोत्सव मंडळांनी ऑनलाइन दर्शनाची सोय करण्यात आली होती. या मुळे सर्वच भाविकांना २४ तास आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेता आलं.

विसर्जनासाठी शासन सज्ज

कोरोनाची सध्या परिस्थिती पाहता शासनानेदेखील विसर्जनासाठी एक नियमावली जाहीर केली आहे.या मध्ये मंडळातील फक्त १० कार्यकर्त्यांना विसर्जनासाठी परवानगी देण्यात आली आहे. तसेच विसर्जनस्थळी भाविकांना आरतीची परवानगी न देता मंडपातच आपली पूजा अर्चना करण्यात यावी असे आदेश देण्यात आले आहे. महत्वाचं म्हणजे लोकांची गर्दी टाळण्यासाठी मिरवणुकीला देखील बंदी घालण्यात आली आहे. शासनाने  विसर्जनासाठी चौपाटीसह अनेक कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे.

सामाजिक कार्यक्रमावर भर

गणेशोत्सव सोबत सामाजिक बांधिलकी जपत मुंबईतील अनेक मंडळांनी सामाजिक कार्यक्रमावर भर देण्यात आली. ताडदेवचा राजा, लालबागचा राजा, जी एस बी सेवा मंडळ या सारख्या अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी या सारख्या विविध कार्यक्रम हाती घेतले.

Related posts

वाढत्या महागाईचा दिवाळी खरेदीला फटका

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन विभागाची जबाबदारी

तीन वर्षांमध्ये मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत २० टक्क्यांनी घट

Leave a Comment