Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशहर

ठाणे परिवहनकडून गणेशोत्सवात नागरिकांना गारेगार प्रवासाची भेट

banner

ठाणे :

गणेशोत्सवात ठाणेकरांना गारेगार प्रवासाची भेट ठाणे परिवहन समितीने दिली आहे. त्यानुसार बुधवारपासून मुंब्रा येथील भारत गिअर कंपनीपासून साईबाबा मार्गे शिवाजी महाराज चौक भिवंडी अशी थेट वातानुकूलित (एसी) बस सेवा सुरु करण्यात आली. या मार्गावर दोन वातानुकूलित (एसी) बसेस देण्यात येणार असून दररोज १६ फेऱ्या या बसेसद्वारे मारण्यात येणार आहेत. या नवीन मार्गामुळे मुंब्र्यातून भिवंडीकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या मागणीनुसार ही बस सेवा उपलब्ध करू दिली आहे. त्याचप्रमाणे शिवाईनगर, भिमनगर, वर्तकनगर मार्गे केळकर कॉलेज अशी बस सेवा देखील २६ सप्टेंबरपासून सुरु करण्यात आली. या मार्गावर सध्या एक वातानुकूलित बस देण्यात आली आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून बसेसची संख्या व फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. पवारनगर परिसरातील वाढती लोकसंख्या विचारात घेता पुढील आठवडयापासून धर्माचा पाडापर्यंत दोन वातानुकूलित बसेस सुरु करण्यात येणार आहेत. वाघबिळ परिसरातील हजारो नागरिकांकरिता देखिल परिवहन सेवा बसेस देणार आहे.

ठाणे पूर्व आणि ठाणे पश्चिम (सॅटीस पूल) ते बोरिवली या मार्गावर प्रवाशांची संख्या विचारात घेऊन २४ सप्टेंबरपासून बस सेवा नव्याने सुरु करण्यात आली आहे. यापूर्वीपासून या मार्गावर व्होल्वोच्या वातानुकूलित बसेस धावत आहेत. तर पारसिक नगर ते ठाणे स्टेशन या मार्गावर देखील वातानुकूलित बस सेवा सुरु केली आहे. कोलशेत परिसरातील वाढती गृहसंकुले व लोकसंख्या विचारात घेऊन दोन वातानुकूलित बस २५ सप्टेंबरपासून सुरु केल्या आहेत. भाईंदर पाडा, हावरे सिटी या मार्गावर देखील प्रवाशांची संख्या व प्रचंड मागणी विचारात घेऊन दोन वातानुकूलित बस २२ सप्टेंबरपासून सुरु केल्या आहेत.

ठाणेकरांच्या सेवेसाठी प्रदूषणविरहीत वातानुकूलित इलेक्ट्रीक बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल करा अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री एकना शिंदे यांनी ठाणे परिवहन उपक्रमास दिल्या. त्यानुसार श्री गणेशोत्सवाचे औचित्य साधून या बसचे लोकार्पण करण्यात आले.
– विलास जोशी, सभापती, परिवहन समिती ठामपा

Related posts

४८ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खोखो स्पर्धेत पुणे व ठाण्याची विजयी सलामी

गणेशोत्सव कालावधीत ‘स्टिंग रे’, ‘जेलीफीश’पासून रहा सावध – मुंबई महापालिकेकडून मार्गदर्शक सूचना जारी

राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यायांमध्ये अद्ययावत उत्कृष्टता केंद्र उभारणार 

Leave a Comment