Voice of Eastern

मुंबई

पारंपरिक गौरी गीते गात आज मुंबईत गौरीचे आगमन झाले. सुहासिनींनी सुंदर वस्त्रालंकार परिधान करून मोठय़ा थाटामाटाने गौराईचे स्वागत केले. गणपतीच्या तिसऱ्या दिवशी गौराई आणि चौथ्या दिवशी शंकरोबाचे आगमन होते. त्यानुसार आज गौराईचे आगमन झाले. घरातल्या सुवासिनींनी वाजत गाजत दारात आलेल्या गौराईची दृष्ट काढून तिला घरात आणली. यानंतर गौराईची मनोभावे पूजा करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा साध्या पद्धतीने गौरीचे आगमन करण्यात आले.

गणरायाच्या आगमनानंतर वेध लागतात ते गौरीच्या आगमनाचे,आज ज्येष्ठा कनिष्ठा गौरीच मोठ्या थाटात घरोघरी आगमन झालं. महाराष्ट्रातील सर्वच विभागातील मराठी जनता वास्त्यव्यास आहे. या गौरीला विदर्भ ,मराठवाडा,खान्देशात महालक्ष्मी म्हणतात तर पश्चिम महाराष्ट्र कोकणात गौरी म्हणतात.ह्या गौरी अगदी 5 ते 10 इंचा पासून ते दोन ते तीन फुटा पर्यंत असतात.

काही ठिकाणी पुतळे असतात तर काही ठिकाणी अगदी महिला शालू,पैठणी नेसतात तश्या प्रकारे गौरीला सजवत असतात.दागदागिने घालून या महालक्ष्मीचा शृंगार केलेला असतो.आज मराठी पंचांगानुसार भाद्रपद शुद्ध अनुराधा नक्षत्रावर षष्ठीला आगमन आवाहन आहे सप्तमीला पूजन आणि अष्टमीला विसर्जन होणार आहे.या दिवशी घरातील महिला मुले विशेष परिश्रम करून आरास करतात चेंबूरच्या कुळकर्णी परिवरकडे आनंदात या महालक्ष्मीच आगमन करण्यात आलं.

Related posts

तमन्ना भाटिया हिने केलं महिला आरक्षण विधेयकाचे कौतुक

मुंबई विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा ; नॅक कडून पाच ऐवजी सात वर्षांसाठी मुदतवाढ

शेतकऱ्यांच्या यशोगाथा मांडणारा पहिलाच राज्यस्तरीय कृषी महोत्सव औरंगाबादमध्ये रंगणार

Leave a Comment